Aurangabad : दोनशेची पावती देऊन पर्यटकांकडून चारशे घेणारा पोलीस निलंबित

औरंगाबाद : पोलीसनामा आॅनलाईन

आैरंगाबादमध्ये पर्यटकांना दोनशेची पावती देऊन चारशे घेणाऱ्या एका पोलीस शिपायाला निलंबीत केले आहे. शेख हारुण शेख रशिद असे पोलीसाचे नाव आहे. दोनशे रुपयांच्या पावतीसाठी पोलिसांकडून 400 रुपयांची मागणी केली जात असे. दोनशे रुपयांच्या पावतीसाठी चारशे रुपये का घेता? असा सवाल पर्यटकांनी विचारला असता पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. शेवटी पर्यटकांनी या विषयावर वाद घालताच पार्किंग वसुलीचं कारण सांगण्यात आले.

हा पोलीस कर्मचारी आैरंगाबादच्या खुलताबाद पोलीस ठाण्यात कार्यरत असून, याप्रकरणी खुलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नोटीस पाठवणार असल्याची माहिती आैरंगाबाद ग्रामिणच्या एसपी आरती सिंह यांनी दिली आहे.