विद्युत विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याचे निलंबन

पिंपरी: पोलिसनामा ऑनलाईन
विजेच्या खांबाचा शॉक बसून नऊ वर्षाच्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी महापालिकेच्या विद्युत विभागातील प्रभारी कनिष्ठ अभियंत्यावर सेवा निलंबनाच्या कारवाईचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जारी केला आहे.
[amazon_link asins=’B0756W2GWM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7c59df3d-84e2-11e8-be1c-ebcb8186d8da’]

बापुसाहेब गोविंद रोकडे असे सेवा निलंबन केलेल्या प्रभारी कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे. हरीओम विनायक नराल (वय 9, रा. सेक्टर नंबर 22, निगडी) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. 26 जून रोजी रात्री नऊच्या सुमारास घराजवळ खेळत असताना महापालिकेच्या हायमास्ट विद्युत खांबाचा शॉक बसून हरिओमचा मृत्यू झाला. रोकडे यांच्याकडे ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत वीजपर्यवेक्षकाचे कामकाज सोपविण्यात आले आहे. हरिओमचा मृत्यू ही गंभीर स्वरूपाची घटना आहे.
[amazon_link asins=’B07D8YJ6B9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’89324b9c-84e2-11e8-977a-2bfba8e81a82′]

या प्रकरणात विद्युत विभागाच्या कामकाजातील निष्काळजीपणा व हलगर्जीपणा झाल्याचे दिसून येत आहे. विद्युत विभागातील अधिकारी, कर्मचा-यांनी आपली जबाबदारी लक्षात घेऊन वेळीच दखल घेणे गरजेचे होते. मात्र, तसे न केल्याने ही घटना घडल्याचे सकृतदर्शनी दिसून येते. रोकडे यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे रोकडे यांना निलंबित करण्याबाबत अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर यांनी 9 जुलै 2018 रोजी शिफारस केली. त्यानुसार, रोकडे यांना तात्काळ सेवानिलंबित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. रोकडे यांना निलंबन कालावधीत अटी-शर्तीनुसार निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे.