निलंबीत पोलीस कर्मचाऱ्यांचा दारूसाठी धिंगाणा

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालया समोरील चौकात निलंबीत पोलीस कर्मचाऱ्याने फुटक दारूची मागणी केली. दुकानदाराने दारू देण्यास नकार दिल्याने त्या पोलीस कर्मचाऱ्याने चौकातच धिंगाणा घातला. सदर पोलीस कर्मचाऱ्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. या अगोदरही त्या कर्मचाऱ्याने अशा प्रकारचा धिंगाणा घातल्याचे नागरीकांनी सांगितले.

मद्यपी यांने दुकानदाराकडे सकाळी मला दारू दे इतरांना दारू देतो मला का देत नाही असे दटावत दुकानदाराला अपशब्द ही वापरले. सदर प्रकार परिसरातील नागरीकांनी हि पाहिला आहे. व दुकानातील व चौकात लावलेल्या सिसीटिव्हीतही कैद झाला असेलच परंतू या बाबत कोणीच काही बोलत नाही.

हा प्रकार घडताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दुकानदारे काही तास दुकान बंद केले होते. यामुळे परिसरात शुकशुकाट होता. ह्याच परिसरातील शहर पोलीस स्टेशन जवळील हाकेच्या अंतरावर बस स्थानक, शहरातील अन्य मोक्याच्या जागी लोडगाडीवर सर्रासपणे मद्य विक्री खुलेआम पणे केली जाते. कर्मचारीही इथेच लाभ घेताना पाहिले आहे असे काही नागरीकांनी सांगितले. कारवाई ही दोन तासांची होते नंतर परिस्थीती जैसे थे असते.  पोलीस मुख्यालयातील अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी या मध्यपी पोलीसनाला निलंबीत करण्यात आले आहे.