कट रचून फसवणूक : पत्रकार, वकिल, RTI कार्यकर्ता, 2 बडतर्फ पोलिसासह 10 जणांवर हडपसर पोलिस ठाण्यात FIR, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पुण्यातल पोलीस, पत्रकार आणि आरटीआय कार्यकर्त्याचे खंडणी प्रकरण धक्कादायकरित्या उघड होत असून, तिसरा गुन्हा दाखल झाला असतानाच चौथप्रकरण देखील समोर आले असून, यात पत्रकार जैन, बडतर्फ पोलीस जगताप, आरटीआय करीकर्ता बराटे यासह वकील आणि इतर 6 जणांवर कटरचून फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. हा सर्व प्रकार 2017 ते 2020 या कालावधीत घडली आहे.

याप्रकरणी बडतर्फ पोलीस शैलेश जगताप, परवेज जमादार, पत्रकार देवेंद्र जैन, आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बराटे, प्रकाश फाले, त्याची पत्नी सविता फाले, शैलेश जगताप याचा पुतण्या जयेश, वकील विजय काळे (पूर्ण नाव नाही), विनय मुंदडा, मुकेश पौडवाल यांच्यावर भादवी कलम 406, 420, 504, 506 (2), 34, 120 (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रिक्षा चालक कैलास क्षिरसाठ (वय 30) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

fir news

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षा चालक असून, ते हडपसर परिसरात राहण्यास आहेत. दरम्यान जगताप व त्याच्या साथीदारांनी कोथरूड, औंध, सेनापती बापट रस्त्यावरील मोक्याच्या जागा खरेदीत पैसे गुंतवल्यास नफा मिळेल, असे आमिष शिरसाठ यांना दाखविले होते. त्यानंतर शिरसाठ यांच्याकडून 10 लाख रुपये घेतले. त्यानंतर त्यांचे मेहुणे विलास नेवगे यांच्याकडून 20 लाख रुपये असे एकूण मिळून 30 लाख रुपये आरोपींना घेतले.

जगताप आणि साथीदारांनी आमिष दाखविल्याने पैसे गुंतवले. परंतु फिर्यादी हे पैसे परत मागण्यास गेल्यानंतर फाले, त्यांची पत्नी व मुलगा यश यांनी शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तर साथीदार जगतापने रिव्हॉल्वरचा धाक दाखविला. जयेश जगताप, परवेज जमादार यांनी धमकावत त्यांना दिलेले पैसे परत मागितल्यानंतर वाईट परिणाम होतील असे म्हटले. तर फाले यांच्यासोबत सतत उपस्थित असणारे बराटे, जैन, मुंदडा व पौडवाल यांच्याकडे पैसे परत मिळविण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर फिर्यादीच्या लक्षात आले की एकच रॅकेट आहे, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भाबड हे करत आहेत.