इस्लामपूर/सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – पंचवीस वर्षाच्या विवाहितेला तिच्या वयाच्या अकराव्या वर्षापासून सलग चौदा वर्षे त्रास देऊन विनयभंग (Molestation) करणाऱ्या मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील निलंबित फारार पोलीस उप निरीक्षकाला (Suspended PSI Arrested) पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. शंकर जयवंत पाटणकर Shankar Jaywant Patankar (वय-32 रा. बोरगाव, ता. वाळवा) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे (Suspended PSI Arrested) नाव आहे.
पीडित विवाहितेने 15 दिवसांपूर्वी शंकर पाटणकर याच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात (Islampur Police Station) तक्रार केली होती. गुन्हा (FIR) दाखल झाल्यापासून पाटणकर फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत असताना गुरुवारी त्याला अटक केली. आरोपी पाटणकर याने पीडित महिलेचा जानेवारी 2009 ते फेब्रुवारी 2023 अशा चौदा वर्षांच्या काळात मानसिक छळ करुन विनयभंग केला होता. (Suspended PSI Arrested)
तू मला आवडतेस, माझ्याशी लग्न कर असे म्हणत आरोपी पाटणकर अश्लिल हावभाव करत होता. तसेच पीडित महिलेच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल करुन स्वत: विवस्त्र होऊन महिलेकडे अशीच मागणी करत होता. याशिवाय दुचाकी आणि चारचाकीमधून महिलेचा पाठलाग करत करणे, भररस्त्यात हात धरणे, मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य पाटणकर याने केले. याबाबत पीडित महिलेने तक्रार दिल्यानंतर तो फरार झाला होता.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अरविंद काटे (API Arvind Kate) करीत आहेत.
Web Title :- Suspended PSI Arrested | suspended sub inspector of borgaon arrested in molestation case
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- HSC Exam | बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये चुका, बोर्डाकडून विद्यार्थ्यांना मिळणार गुण पण ‘या’ विद्यार्थ्यांना
- Pune Pimpri Chinchwad Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार, तर प्रियकराच्या भावाने
केली सोशल मीडियात बदनामी; हिंजवडीमधील प्रकार - Sandeep Deshpande | संदीप देशपांडेवरील हल्लाप्रकरणी दोन जणांना अटक; भांडुपमधून केली अटक