‘या’ जागांवरील सस्पेंन्स कायम

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपने आपली आज १८२ जणांची पहिली यादी जाहीर केली. महाराष्ट्रातील १६ उमेदवारांची घोषणा यामध्ये करण्यात आली आहे. यामध्ये १४ विद्यमान खासदरांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. परंतु आज जाहीर झालेल्या यादीमध्ये काही जांगावरील उमेदवारांची नावे घोषीत न केल्याने या जागांवरील सस्पेंन्स अद्याप कायम आहे.

भाजप मुंबईतील सहापैकी तीन जागांवर निवडणूक लढवणार आहे. मात्र, किरीट सोमय्या खासदार असलेल्या ईशान्य मुंबई मतदारसंघ वगळता इतर जागांवरील उमेदवारांची घेषणा झाली. शिवसेनेकडून सोमय्यांच्या नावाला विरोध असल्याने सोमय्यांबाबत अद्याप निर्णय झाला नाही.

सोलापुरात सुशीलकुमार शिंदे, बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोणते उमेदवार द्यायचे याबाबतही भाजपचा निर्णय झालेला नाही. त्याच प्रमाणे राष्ट्रवादीकडून माढ्याचा तिढा सुटत नसल्याने भाजप त्या ठिकाणीही आस्ते कदम घेत आहे.
आज उमेदवारी जाहीर न झालेल्या मतदरसंघामध्ये ईशान्य मुंबई, दिंडोरी, सोलापूर आणि जळगाव या मतदार संघांचा समावेश आहे. सोलापूर मतदार संघातून मोदी लाटेत निवडून आलेले शरद बनसोडे यांना या ठिकाणी विरोध होत असल्याने या जागेवर कोणाला उमेदवारी द्यायची याची चाचपणी भाजपकडून सुरु आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us