भाजपाच्या 5 सदस्यांचे निलंबन ! पक्षविरोधी कार्यवाही केल्याने निर्णय

पोलीसनामा ऑनलाईन टीम : येथील चिंध्रण ग्रामपंचायतीमधील पाच ग्रामपंचायत सदस्यांचे भारतीय जनता पक्षातून ( bjp) निलंबन करण्यात आलं. पक्ष विरोधी कार्यवाही केल्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आलं. अशी माहिती पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुण भगत यांनी दिली आहे.

भाजपाचे ( bjp) ग्रामपंचायत सदस्य नरेश पोशा सोनवणे, तुषार दशरथ दुर्गे, गणपत महादेव कडू, इंदिरा एकनाथ पाटील, चंद्रा कृष्णा कडू यांनी शेकाप सोबत संगनमत केलं. ग्रामपंचायतीतील भाजपच्या सरपंच कमलाबाई एकनाथ देशेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला. केवळ शेकापच्या भूलथापांना भुलून या पाच सदस्यांनी अविश्वास संमत केला.

भाजपाच्या सदस्यांनी केलेल्या या वर्तनामुळे पक्षाचं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर, वरील भाजपाचे ग्रामपंचायत सदस्याचं उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या शिफारसीनुसार पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे.