‘पोलीसनामा’च्या Exlusive ‘बिग ब्रेकिंग’चा IMPACT ! कडक Lockdown मध्ये महापालिकेच्याच्या 3 कॉन्ट्रॅक्टरसह 5 डान्सर तरुणींसोबत ‘मद्यपान’ अन् ‘डांगडिंग’ करणारा ‘तो’ PMC चा इंजिनियर तडकाफडकी निलंबित; ‘त्या’ संबंधांची होणार चौकशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन करण्यात आला आहे. राज्यात कडक लॉकडाऊन असतानाही मुंबईहून बारगर्ल आणत त्यांच्यासोबत फार्महाऊसवर केलेल्या ‘डान्स पार्टी’ची गंभीर दखल पुणे महापालिका प्रशासनाने घेतली आहे. या पार्टीचे आयोजन करुन बारबालांसोबत थिरकणाऱ्या पालिकेचा अभियंता विनायक बडे याला निलंबित करण्यात आले आहे. फार्महाऊसवर झालेल्या पार्टीचे वृत्त सर्वप्रथम पोलीसनामा ऑनलाइन वर प्रसिद्ध झाले होते. त्याची पालिका प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे.

https://wp.me/pb09b8-1LcO

कुडजे गावातील लबडे फार्महाऊसवर पालिकेतील ठेकेदार आणि अधिकारी हे पोलिासांनी टाकलेल्या छाप्यात पकडले गेले होते. यामध्ये पालिकेचे अभियंता विनायक बडे यांना देखील अटक करण्यात आली होती. पालिकेने पोलीसनामाच्या वृत्ताची दखल घेऊन विनायक बडे यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. अटक करण्यात आलेले बहुतांश जण हे पुणे पालिकेतील ठेकेदार आहेत. विनायक बडे हा पालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयामध्ये कनिष्ट अभियंता आहे.

हा प्रकार गंभीर आहे. पकडलेल्या ठेकेदार आणि बडे यांच्याच्यातील संबंध नेमके काय आहेत हे तपासण्यात येणार आहे. बडे यांची विभागीय चौकशी केली जाणार आहे. ठेकेदारांनी केलेल्या कामांची देखील तपासणी केली जाणार आहे. ही कामे खरोखरच झाली आहेत का, झालेल्या कामांची तपासणी कोणी केली होती. कोणत्या अधिकाऱ्यांनी सही कली, हे सर्व बारकाईने पाहिले जाणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सांगितले.

अटक करण्यात आलेले आरोपी

पोलिसांनी मंगेश राजेंद्र शहाणे (वय 32, रा. संतनगर, अरण्येश्वर), ध्वनीत समीर राजपुत (वय 25), निखील सुनिल पवार (वय 33, रा. पर्वती दर्शन), समीर उर्फ निकेश दिलीप पायगुडे (वय 39, रा. आगळंबे फाटा, कुडे गाव, ता. हवेली), विवेकानंद विष्णु बडे (वय 42, रा. नवी सांगवी), प्राजक्ता मुकुंद जाधव (वय 26, रा. मिलिंदनगर, सांताक्रुझ, मुंबई), निलेश उत्तमराव बोधले (वय 29, दोघेही रा. पुरंदर हाऊसिंग सासोयटी, म्हाडा कॉलनी), सुजित किरण आंबवले (वय 34, रा. बालाजीनगर) आणि आदित्य संजय मदने (वय 24, रा. अंधेरी पुर्व, मुंबई) यांना अटक केली. तर, काही आरोपींना न्यायालयाने ३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर आरोपींची जामीनावर सुटका केली आहे.