यवतमाळ : API सह, 5 कर्मचारी निलंबनाच्या ‘रडार’वर

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – पोलिस दलाला शिस्तीचे खाते म्हणून ओळखले जाते. मात्र यात कर्तव्यात कसूर करणा-यांची संख्याही मोठी आहे. अशा विरुध्द पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील- भूजबळ यांनी कारवाईचा बढगा उगारला आहे. एक सहायक पोलीस निरीक्षक, पाच पोलीस कर्मचारी निलंबनाच्या रडावरवर असल्याची माहिती अधिक्षकांनी नुकतीच पोलिस मुख्यालयातील बैठकीत दिली आहे.
पोलीस मुख्यालयात अधिक्षकांनी प्रलंबित गुन्ह्याचा आढावा घेण्यासाठी एक बैठक बोलावली होती. त्यासाठी जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक, तपास अधिकारी आदीना बोलावण्यात आले होते. यावेळी उपविभागीय प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा घेण्या आला. एक वर्षापेक्षा प्रलंबित गुन्ह्यांची संख्या अधिक असल्याचे आढळून आल्याने अधिक्षकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. प्रलंबित प्रकरणाचा तात्काळ निपटारा करावा, अन्यथा कुणाचीही गय केली जाणार नाही. असा इशारा त्यांनी दिला. तसेच कर्तव्यात कसूर करणा-यांना निलंबित करण्यात येईल. एक सहायक पोलीस निरीक्षक, पाच पोलीस कर्मचा-यावर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिक्षकांनी बैठकीत सांगतिले.