इंदापूर तालुक्यातील वनजमिनी अधिग्रहणास स्थगिती : हर्षवर्धन पाटील

इंदापूर : पोलिसनामा ऑनलाईन (सुधाकर बोराटे) – इंदापूर तालुक्यात वन विभागामार्फत सुरू असलेल्या वन जमिनी अधिग्रहण कार्यवाहीस आज गुरुवारी राज्याचे वित्त आणि नियोजन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी तातडीने स्थगिती दिल्याची माहिती राज्याचे माजी सहकार व संसदिय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

इंदापूर तालुक्यातील जवळपास ६८ हुन अधिक गावात वन खात्यामार्फत संबंधित शेतकरी व नागरिकांच्या जमिनी ताब्यात घेण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू ठेवला वास्तविक १ मार्च १८७९ हा महसूल विभागाच्या अधिपत्याखालील वन जमीनी आरक्षित वन म्हणून असाव्यात अशा आशयाने गव्हर्नर जनरल इन कौन्सिल यांनी घोषित केलेला तक्ता असताना ही वन विभागाचे अधिकारी हे तालुक्यात वन जमिनी अधिग्रहण करत आहेत.

त्यामुळे मुंबईत सुरू असलेल्या अधिवेशनात कॉग्रेसच्या वतीने हर्षवर्धन पाटील व पिपल्स रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने आमदार जोगेंद्र कवाडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे, पदाधिकारी व बाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार व दीपक केसरकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून तातडीने ही कारवाई थांबवण्याचे निवेदन देण्यात आले यावर दोन्हीही मंत्री महोदयांनी तातडीने भ्रमणध्वनीवरुन राज्याचे वन विभागाचे मुख्य सचिव विकास खर्गे यांना इंदापूर तालुक्यात सुरू असलेल्या कारवाईला स्थगिती देण्याच्या सुचना दिल्या.

८ मार्च व लोकसभेची आचारसंहिता लागायच्या अगोदर वन विभागाचे मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार व वन विभागाचे अधिकारी यांची सयुक्त बैठक आयोजित करून राज्य सरकार कडून त्यासंबंधीचा प्रस्ताव तयार करून केंद्र सरकाला पाठवण्यासाठी कार्यवाही करावी अश्या सुचना दिल्याची माहीती हर्षवर्धन पाटील यांनी दीली.यावेळी पाटील यांच्यासमवेत आमदार जोगेंद्र कवाडे, संजय सोनवणे, भास्कर गुरगुडे,महेंद्र रेडके, सुभाष काळे, सुरेश देवकर,रमेश मोरे, बाबा मदने, सुनील कणसे ,राजेंद्र हजारे संतोष लोंढे , यांच्यासह पदाधिकारी व तालुक्यात बाधीत शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.दरम्यान तालुक्यात वन विभागाच्या कारवाईस स्थगिती मिळाल्याची वार्ता कळताच कॉग्रेस पार्टीचे कौतुक होत आहे.