आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळ मुदत वाढीस स्थगिती द्या : मिलिंद खराडे

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळ मुदत वाढीस स्थगिती देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सदस्य मिलिंद खराडे यांनी ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी यांना केली आहे. याचबरोबर संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळ मुदत वाढीस आव्हान देणार असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.

१२ जानेवारी २०१८ रोजी ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या आयुक्त पदाच्या कारकिर्दीची मुदत संपली होती. मात्र मुदत संपल्यानंतरही १ वर्ष कोणत्याही शासकीय आदेशाशिवाय ते ठाण्या सारख्या महत्वाच्या आयुक्त पदी कार्यरत राहिले. परंतु २९ जानेवारी २०१९ रोजी ज्यावेळेस मी राज्यसरकारला आंदोलनाचा इशारा दिला त्यादरम्यान फडणवीस सरकारने आदेश जारी केला. असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सदस्य मिलिंद खराडे यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, संजीव जयस्वाल यांच्या विरोधात यापूर्वी अनेक आंदोलने झाली परंतु राज्य शासनाने काहीही हालचाल केली नाही. ठाणे शहरात सध्या कोणतीही आपत्ती जनक परिस्थिती उद्भवलेली नाही. अशा परिस्थितीत संजीव जयस्वाल यांची मुदतवाढ ही राज्यातील प्रशासकीय अधिकारी हे ठाणे महानगरपालिकेचा कारभार सांभाळण्यास योग्य नसल्याचा संदेश पसरवणारी आहे. असेही ते म्हंटले. याचबरोबर आपण जिल्हा निवडणूक अधिकारी, राज्य निवडणूक आयुक्त व मुख्य मुख्य निवडणूक आयुक्त दिल्ली व लोकायुक्त यांच्याकडे निर्णयाविरोधात दाद मागणार असून कायदेशीर सल्ला घेऊन न्यायालयीन लढाई लढणार असल्याचेही त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हंटले आहे.