शरद पवार यांच्या गुगलीनंतर मावळच्या उमेदवारीचा ‘सस्पेंन्सच सस्पेंस’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन- वाकड येथील यशोदा मंगळ कार्यालयात मावळ लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्हिडीओ कॉन्फ्रन्सिंगव्दारे संवाद साधला.

शरद पवार यांनी यावेळी त्यांचे विचार सर्वांसमोर मांडत संवाद साधला. यावेळी लोणावळ्याचे माजी शहराध्यक्ष राजू बोराटे यांनी मावळ मधून पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्याबद्दल शरद पवार यांचे आभार मानले. तसेच मावळमधून पार्थ यांच्या विजयासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू असं वक्तव्य केले. त्यावर शरद पवार यांना तात्काळ उत्तर दिले. अजून पक्षाकडून मावळसाठी कोणाचीही उमेदवारी जाहीर झाली नाहीये. तसेच येत्या दोन दिवसात मुंबईतील मुख्य पक्ष कार्यालयतून राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी जाहीर होईल. पार्थ पवार यांची उमेदवारी पक्षाने अद्याप जाहिर केली नाही. पक्ष जो कोणी उमेदवार देतील त्याला विजयी करा असं सांगत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मावळच्या उमेदवारीचा ‘सस्पेंन्स’ अधिकच वाढवला आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सला पार्थ पवार, युवकचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, मयुर कलाटे, राजू मिसाळ, विनोद नढे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका मंगला कदम, अपर्णा डोके, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर तसेच मावळ लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून मावळ लोकसभेची उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्कंठा प्रचंड वाढली आहे. सुरूवातीला शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील आणि जेष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्या नावाची चर्चा होती. मात्र अचानकपणे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव चांगलेच चर्चेत आले. पिंपरी चिंचवड शहरासह मावळातही पार्थ यांनी पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी वाढवल्या होत्या. मोरया गोसावी गणपती, एकविरा देवीचे दर्शन घेऊन त्यांनी एकप्रकारे प्रचाराचीच सुरूवात केल्याचे बोलले जात होते. दरम्यान दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी स्वत: माढा मधून लढणार नसल्याचे सांगत, पार्थ पवार निवडणुक लढतील असं वक्तव्य केले होते. त्यामुळेच मावळमधून पार्थ यांची उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली होती. मात्र आज खुद्द शरद पवार यांनीच पार्थ यांची उमेदवारी अद्याप जाहीर झाली नसल्याचे सांगत, मावळची उमेदवारी नेमकी कोणाला जाणार याचा ‘सस्पेंन्स’ वाढवला आहे. दरम्यान मावळमधून ऐंनवेळी स्वत: शरद पवारच रिंगणात उतरू शकतात अशी ‘कुजबूज’ राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Loading...
You might also like