बारामती शहर पोलीस ठाण्यातील ‘तो’ पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कर्तव्यात गैरवर्तणुक केल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाला पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. विजय सोपान वाघमोडे असे तडकाफडकी निलंबीत करण्यात आलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. वाघमोडे याच्या निलंबनाचे आदेश पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी आज (बुधवार) काढले आहेत.

शासकीय कर्तव्यात दुर्लक्ष करणे, सतत गैरहजर राहणे, गणवेश परिधान न करता उपस्थित राहणे तसेच वरिष्ठांनी केलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष केल्या प्रकरणी वाघमोडे याचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच त्यच्यावर कर्तव्यात बेजबाबदार व निष्काळजीपणाच्या गंभीर गैरवर्तणुकीचा ठपका ठेवत पोलिस अधीक्षकांनी त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्याच्या गैरवर्तुणीकीची दखल घेत विजय वाघमोडे याला निलंबित केले आहे.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक