‘त्या’ अश्लील बोलणाऱ्या महिला अधिकाऱ्याच्या एजेन्सीचे निलंबन

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन

बँकेचे कर्ज वेळेत न भरल्यामुळे फोन करून कर्जदाराला अश्लील भाषेत शिव्या तसेच अरेरावी करणाऱ्या महिला अधिकाऱ्याच्या एजेन्सीचे आज आरबीएल बँकेने निलंबन केले आहे. मेसर्स स्विफ्ट कलेक्शन सर्व्हिसेस एजेन्सी असे निलंबित केलेल्या एजेन्सीचे नाव आहे.

कर्जदाराने कर्ज वेळेत न भरल्यामुळे आरबीएल बँकेच्या कलेक्शन एजेन्सीच्या महिला अधिकाऱ्याने कर्जदारास फोनवर अश्लील भाषेत संवाद साधला होता ,तसेच शिवीगाळ आणि कुटुंबातील पत्नी व आई यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. या संवादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. याप्रकरणा नंतर त्यांच्यावर पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. यानंतर आता आरबीएल बँकेने या महिला कार्यरत असलेल्या एजेन्सीचे निलंबन केले आहे. बँकेने घालून दिलेल्या अटी आणि शर्थीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत बँकेकडून ही कारवाई करण्यात आली आहे.