ट्रिपल केसरी आणि सहायक पोलीस आयुक्त (ACP) नरसिंह यादव तडकाफडकी निलंबित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई पोलीस दलात एलए -५ मध्ये सहायक पोलीस आयुक्त (ACP) पदावर कार्यरत असणाऱे नरसिंह यादव यांना उत्तर मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांचा प्रचार करणे अंगलट आले आहे. नियमानुसार कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला निवडणुकीत उमेदवाराचा प्रचार करता येत नाही. तरी देखील नरसिंह यादव यांनी राजकीय पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला. याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नरसिंग यादवविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी यादवविरोधात विभागीय चौकशीही केली जाणार आहे.

नरसिंह यादव यांच्या विरुद्ध ‘रिप्रेझेंन्टेटीव्ह ऑफ पोलीस कायदा’ कलम १२९(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक राधेश्याम काळुराम शर्मा यांनी अंबोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नरसिंह यादव पोलीस दलात कार्यरत असून देखील त्यांनी उत्तर मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांचा प्रचार करत असल्याचे पुढे आले. त्यानंतर त्यांच्याविरोधात अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुवर्ण पदक मिळवल्यामुळे त्यांची नियुक्ती थेट पोलीस उपअधिक्षकपदी करण्यात आली होती. नियमानुसार कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला निवडणुकीत उमेदवाराचा प्रचार करता येत नाही. असे असताना देखील नरसिंह यादव यांनी निरुपम यांच्या प्रचारात सहभागी झाले होते.

तसेच सरकारी अधिकारी असलेले यादव हे काँग्रेस उमेदवार निरुपम यांच्याबरोबर स्टेजवर प्रचार करत असल्याची बाबा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांच्या लक्षात आली. त्यानुसार खात्रीसाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी निरुपम यांच्या सभेदरम्यान काढण्यात आलेले चित्रीकरण तपासले. यामध्ये यादव हे निरुपम यांचा सोबत प्रचाराच्या स्टेजवर उपस्थित असल्याचे दिसून आले. यानंतर नरसिंह यादव यांच्याविरोधात अंबोली पोलीस ठाण्यात ‘रिप्रेझेंन्टेटीव्ह ऑफ पोलीस कायदा’ कलम १२९(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणामुळे लवकरच यादव यांना पोलीस दलातील विभागीय चौकशीलाही सामोरे जावे लागणार आहे.

Loading...
You might also like