दिल्लीच्या IGI एअरपोर्टवर मिळालेल्या संशयित बॅगमध्ये होतं RDX, सुरक्षा यंत्रणेमध्ये प्रचंड खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका व्यक्तीकडून RDX जप्त करण्यात आले आहे. टर्मिनल क्रमांक तीनवर हि कारवाई करण्यात आली असून सुरक्षा यंत्रणांनी हि कारवाई केली आहे. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास हि कारवाई करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांना एका संदिग्ध बॅगमध्ये RDX असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बॅग जप्त केली. त्यानंतर केलेल्या तपासात त्यांना मोठ्या प्रमाणात स्फोटके आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तसेच विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

स्फोटके मिळाल्याची माहिती मिळाल्यानंतर विमानतळावर काही काळ गडबड उडाली होती. त्यामुळे काही काळ प्रवाशांना रोखून धरण्यात आले होते. तसेच तिसऱ्या क्रमांकाच्या टर्मिनलला देखील बंद करण्यात आले होते.

Visit : Policenama.com