मेडिकल कॉलेजमध्ये शिकणार्‍या विद्यार्थीनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ

मिरज : पोलीसनामा ऑनलाइन – रॅगिंगमुळे पायल तडवी या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाचा मिरजमध्येही असाच प्रकार घडला आहे. मिरज वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या पल्लवी पंडीत (वय-१९) हिचा संशयास्पद मृत्यू झाला होता. पायल तडवी प्रमाणेच पल्लवीने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याचा संशय तिच्या आई-वडीलांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

पल्लवी पंडीत ही मिरज येथील वॉन्लेस हॉस्पिटल, मिरज मेडीकल सेंटर येथे फिजिओथेरेपीच्या पहिल्या वर्षात शिकत होती. तिचा २ फेब्रुवारी २०१९ रोजी हॉस्टेलच्या बाथरुममध्ये मृतदेह आढळून आला होता. पल्लवीचा मृत्यू होऊन पाच महिने उलटले असून अद्याप तिचा मृत्यू कशामुळे झाला हे तिच्या पालकांनी समजू शकले नाही. पोलिसांकडून देखील त्यांना योग्य वागणूक मिळत नसल्याचा आरोप तिच्या आई-वडीलांनी केला आहे.

पल्लवीचा मृत्यू पायल तडवी प्रमाणे झाला असल्याचा संशय व्यक्त करून तिच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी पल्लवीच्या आई-वडीलांनी केली आहे. तिच्या आई-वडिलांनी कॉलेज प्रशासनाकडे चौकशी केली. मात्र, कॉलेज प्रशासनकाडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. तसेच पोलिसांनी शवविच्छेदनाचा उच्चस्तरीय अहवाल प्रप्त झाल्यानंतर त्यानुसार तपास केला जाईल असे सांगितले. त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आरोग्यविषयक वृत्त-
भारतातील ‘या’ ७ योगगुरूंचे जगभरात ‘फालोअर्स’, जाणून घ्या त्यांच्याबद्दल
लहान मुलांनाही शिकवा ही “योगासन” होतील फायदे
लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय
मानसिक आरोग्य जपण्यासाठी झोप आहे महत्वाची