एअरहोस्टेसचा संशयास्पद मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंथा 

दिल्लीच्या हौजखास या आलिशान परिसरातील पंचशील पार्कमध्ये एका एअरहोस्टेसचा संशयित मृत्यू झाला आहे. तिने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, मृत्यूपूर्वी तिने माहेरच्यांना मेसेजेस करुन आपल्या पतीबद्दल अनेक तक्रारी केल्या होत्या.

[amazon_link asins=’B07257DMPT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1a9244e0-88bd-11e8-a9c1-01ec10fbbcfa’]

अनिसिया बत्रा ही लुफ्थांसा एअरलाईन्समध्ये काम करीत होती. ३९ वर्षाच्या अनिसियाने घरगुती भांडणातून हे टोकाचे पाऊल उचलले. या एअरहोस्टेसचे ७ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पण, पती-पत्नींमध्ये नेहमीच भांडण होत होते. अनिसिया बत्राने मृत्युपूर्वी आपला पती मयांक याला एक मेसेज पाठवला होता. त्यामध्ये मी टोकाचे पाऊल उचलत असल्याचे तिने म्हटले होते. तिचा मेसेज मिळताच, घरातच असलेल्या मयांकने तात्काळ इमारतीच्या छताकडे धाव घेतली. पण, तत्पूर्वीच अनिसियाने छतावरुन उडी मारली होती. त्यानंतर,  लगेचच अनिसियाला रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अनिसियाचे वडिल निवृत्त लष्कर अधिकारी असून याप्रकरणी एसडीएम चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, अनिसियाच्या आई-वडिलांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. तसेच अनिसियाला तिच्या पतीकडून सातत्याने मारहाण करण्यात येत होती, असा आरोपही अनिसियाच्या कुटुंबीयांनी केला आहे.