खा. साध्वी प्रज्ञा यांना प्राप्त झालेलं पत्र हे पुण्यातील खडकी बाजारातून गेलेलं ? लेटर उर्दू भाषेतील ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपा खासदार आणि मालगाव बाँम्ब स्फोटाप्रकरणातून निर्दोश सुटका झालेल्या साध्वी सिंग यांच्या घरी आलेले उर्दु भाषेतील संशयित पत्र पुण्यातून पाठविण्यात आल्याची माहिती समोर आले आहे. पत्रावर लिहीलेला पत्ता पुण्यातला असून, याबाबत अद्याप तरी पुणे पोलिसांशी भोपाळ पोलिसांनी संपर्क साधलेला नाही. मात्र, या पत्रामुळे देशभरात खळबळ उडाली आहे.

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर मुळच्या मध्यप्रदेशातील भोपाळ जिल्ह्यातील आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या. दरम्यान, 2008 मध्ये झालेल्या मालेगाव बाँब स्फोट प्रकरणात त्यांना अटक केली होती. अनेकवर्ष कारागृहात होत्या. या प्रकरणात निर्दोश सुटका झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी भारतीय जनता पक्षातर्फे भोपाळमधून खासदारकीची निवडणूक लढविली. त्यात निवडून आल्या.

दरम्यान, मंगळवारी दुपारी साध्वी यांच्या घरी पोस्ट खात्यामार्फत उर्दु भाषेतील पत्र आले आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुरक्षा सल्लागार अजित डोवाल तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा उल्लेख आहे. या नावांवर लाल पेनाने संशयास्पद खूना केल्या आहेत. पत्रात तिघांचे फोटोही असून, त्यात बंदूकी त्यांच्या फोटोवर रोखल्याचे दाखविण्यात आले आहे. दरम्यान, या पत्रात पांढर्‍या रंगाच्या दोन पुढ्या आढळून आल्या आहेत. ती पावडर हाताला लागल्यानंतर खाज सुटत असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर भोपाळ पोलिसांसह सुरक्षा यंत्रांनी तेथे धाव घेतली आहे. पत्र ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक तपासात हे पत्र पुण्यातून पाठविण्यात आल्याचा उल्लेख आहे. पत्रावर पुण्यातील शिवाजी चौक, खडकी बाजार, खडकी जि. पुणे, महाराष्ट्र, इंडिया असे लिहीले आहे.

त्यानुसार तपास करण्यात येत आहे. दरम्यान अद्याप याबाबत पुणे पोलिसांशी कोणीही संपर्क साधलेला नाही. तक्रार किंवा भोपाळ पोलिसांनी संपर्क साधल्यास त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like