अर्नाळा येथे टाईम बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

महाराष्ट्राची धमनी असलेली मुंबई अतिरेक्यांकडून तसेच काही समाजकंटकांकडून नेहमीच लक्ष्य केली जाते. आता मुंबईतील विरारच्या अर्नाळा भागात टाइम बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याची माहिती मिळाली आहे. टाइम बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. फेक्ट्रिपाडा येथील कचरा पेटीमध्ये 10 जिलेटिनच्या कांड्या आणि टायमर अशा साहित्यासह बॉम्ब असल्याची माहिती मिळत आहे. शनिवारी (६ ऑक्टोबर ) राजी सकाळी ९. ३० च्या सुमारास टाईम सदृश्य वस्तू सापडली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शनिवार (६ ऑक्टोबर ) सकाळी ९. ३० च्या सुमारास नेहमीप्रमाणे फेक्ट्रिपाडा परिसरात कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे आलेल्या कर्मचाऱ्यांना ही टाइम बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली. त्यानंतर लगेचच अर्नाळा पोलिसांना याबबाबत त्यांनी माहिती दिली. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकला याची माहिती देण्यात आली आहे. पण टाइम बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आल्यामुळे या परिसरात मात्र खळबळ माजली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’23858147-c93d-11e8-a76f-dbd37374575c’]

खोट्या प्रतिष्ठेसाठी आई-वडिलांकडून  मुलीचा खून 
सोलापूर : पुरोगामी महाराष्ट्रात ऑनर किलिंगच्या घटना घडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मालेगावानंतर आता पंढरपुरातही आई-वडिलांनीच आपल्या मुलीला  ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीने सालगड्याच्या मुलासोबत प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून वडिलांनी मुलीला ठार केले आहे . सदर घटना सलगर बुद्रुक या ठिकाणी ही  घडली आहे.रागाच्या भरात वडिलांनी आणि आईने मुलीला ठार केले त्यानंतर तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले. हत्या आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी विठ्ठल धोंडिबा बिराजदार आणि त्यांची पत्नी श्रीदेवी विठ्ठल बिराजदार या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.अनुराधा विठ्ठल बिराजदार (वय -२२) असे हत्या झालेल्या मुलीचे नाव असून ती  बी.ए.एम.एस. चे शिक्षण घेत होती.
[amazon_link asins=’B0757K3MSX,B00FRCNR6U’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2a9536d2-c93d-11e8-840c-7db4680c0da9′]
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराधा कर्नाटकातील सिंदगी या ठिकाणी बी.ए. एम. एस. चे शिक्षण घेत होती. विठ्ठल बिराजदारांकडे सालगडी म्हणून काम करणाऱ्याच्या मुलाने अनुराधाशी सिंदगी येथे जाऊन लग्न केले. विठ्ठल बिराजदारला म्हणजेच अनुराधाच्या वडिलांना या प्रेमविवाहाची माहिती मिळाली. अनुराधाने प्रेमविवाह केल्याने तिच्या आई वडिलांना रुचले नाही.  वडिलांनी  सिंदगीला जाऊन अनुराधाला घरी आणले. समाजातील बदनामीच्या खोट्या भीतीनं श्रीदेवी आणि विठ्ठल बिराजदार यांनी ५ ऑक्टोबरच्या पहाटे सलगर या ठिकाणी आपल्या मुलीची हत्या केली आणि कुणाला समजण्याच्या आत  शेतातच तिच्या मृतदेहावरअंत्यसंस्कारही केले.
[amazon_link asins=’B017IYSTVW,B0753J7324′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3818d6b1-c93d-11e8-b36a-afcd7f3fae5e’]
दरम्यान ,  मृत अनुराधाने मृत्यूपूर्वी दोन चिठ्ठ्या लिहून ठेवल्या होत्या. त्यामध्ये तिने वडिल आणि सावत्र आईपासून माझ्या जीवाला धोका आहे असे लिहून ठेवले  केले होते. माझे आई वडिल मला मानसिक त्रास देत आहेत, मला ठार करण्याच्या प्रयत्नात आहेत हे मला लक्षात आले असून माझा मृत्यू झाल्यास त्यांना जबाबदार धरण्यात यावे असेही अनुराधाने लिहून ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली. या चिठ्ठ्यांच्या आधारे अनुराधाच्या आई वडिलांना अटक करण्यात आली. आता या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जातो आहे.