पाकिस्तानातून भारतात येणाऱ्या सतलज नदीचे पाणी ‘विषारी’ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या भारताविरूद्ध कुरापती सुरूच आहे. सतलज नदीतील चामड्याच्या कारखान्यांमधून विषारी रसायने व कचरा टाकून पाकिस्तान आपले पाणी दूषित करीत आहे, त्यामुळे पंजाबच्या सीमावर्ती खेड्यांमध्ये लोक आजारी पडले असून जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. तसेच पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

सतलज नदीचे पाणी भारत आणि पंजाबच्या काही भागामधून पाकिस्तान मध्ये जाते नंतर पुन्हा भारतात प्रवेश करते. पाकिस्तानच्या कसूर जिल्ह्यात सतलज नदीचे पाणी दूषित केले जात आहे. सतलजचे पाणी पाकिस्तानमध्ये प्रवेश करताच लेदर कारखान्यांचे पाणी सतलजच्या पाण्यात सोडण्यात येत आहे जेणेकरून पाणी दूषित व्हावे आणि भारताचे नुकसान व्हावे.

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी पाणी येते आणि त्यांच्या पिकांचे नुकसान होते मात्र ह्यावेळेस पाण्यात काहीतरी विषारी पदार्थ मिसळलेले असावेत कारण पाण्याची दुर्गंधी पसरली आहे. यामुळे काही जनावरे मृत पावली आहेत. तसेच, मनुष्यांना श्वास घेणे आणि पाणी पिणे कठीण झाले आहे. पंजाबच्या सीमावर्ती खेड्यांना दरवर्षी पुराचा सामना करावा लागतो त्यामुळे त्यांची पिके वर्षानुवर्षे वाया गेली आहेत. परंतु यावेळी, सतलज नदीमध्ये पाण्याच्या पुराच्या आड विषारी पाणी सोडण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त