सुतळी बॉम्बमुळे फुटली ‘कवटी’, वकिलाचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशातील गुनामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सुतळी बॉम्ब फुटल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुतळी बॉम्ब फुटल्याने एका 28 वर्षीय वकिलाचा मृत्यू झाला असून कानाजवळ हा बॉम्ब फुटल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलसांनी दिली आहे. हा स्फोट इतका भयंकर होता कि, त्या व्यक्तीच्या कवटीचा देखील काही भाग फुटला. या घटनेत वकिलाचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेडजवळ ठेवलेल्या एका बॉक्समध्ये हा सुतळी बॉम्ब होता. त्याचा स्फोट झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. तपासानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार असून पोलिसांनी घटनास्थळाचा तपास सुरु केला आहे. सध्या पुरावे शोधण्याचे काम सुरु असून लवकरच याचे कारण समोर येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.

मृत व्यक्तीचे नाव अमित असून ते पेशाने वकील होते. त्याचबरोबर स्पर्धापरीक्षांची देखील ते तयारी करत होते. हि घटना घडली त्यावेळी त्यांच्या लहान भावाने खोलीकडे धाव घेतली असता संपूर्ण खोलीत धूर झालेला पाहून त्याला धक्का बसला. त्याच्या भावाला पाहिले असता तो अंत्यंत वाईट अवस्थेत होता. त्याच्या कवटीच्या एका बाजूचा भाग पूर्णपणे फुटला होता आणि खोलीत सगळीकडे रक्ताचा सडा पडला होता.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून चार सुतळी बॉम्ब जप्त केले असून हे नक्की फटाके आहेत कि स्फोटके आहेत याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. त्याचबरोबर जर हि स्फोटके असतील तर खोलीत गेली कशी याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

Visit : Policenama.com