सुवर्णा, संदीप कोतकर यांच्यासह औदुंबर कोतकरचा ही खुनाच्या कटात सहभाग?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन

केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी तपासातून आता नवीन माहिती समोर आली आहे. या प्रकरणात दोषारोपत्र दाखल झालेल्यांसहित माजी उपमहापाैर सुवर्णा कोतकर, त्यांचे पती माजी महापाैर संदीप कोतकर यांच्यासह आैदुंबर बाळासाहेब कोतकर या आणखी तिघांचा खुनाच्या खटल्यात सहभाग असल्याचे तपासातून समोर आलं आहे.  त्यांना अटक करून आणखी पुरावे गोळा करून संबंधितांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्याची तजवीज ‘सीआयडी ‘ ने शुक्रवार (दि .६) रोजी न्यायालयात चार्जशीट दाखल करताना ठेवली आहे.
[amazon_link asins=’B06VWZ9DQ5′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’42fd7b31-843d-11e8-b83f-d7c0f6a17314′]

याप्रकरणी सविस्तर वृत्त असे की, मूळ फिर्यादीत आरोपी म्हणून उल्लेख असलेले, मात्र अजून फरार असलेले २१ जण अटक असतानाही सबळ पुरावा न मिळाल्यामुळे  दोषारोपपत्र ठेवू न शकलेल्या आमदार संग्राम जगताप आणि बाळासाहेब  कोतकर या दोघांसह ,अशा  एकूण २३ जणांच्या विरुद्ध सबळ पुरावा मिळाल्यास त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र ठेवण्याची तजवीज ठेवली आहे. मात्र अजूनही या २३ जणांविरुद्ध कोणताही पुरावा मिळालेला नाही. यामध्ये  तीन आमदारांचा समावेश आहे. परंतु सुवर्णा कोतकर गुन्ह्यात आरोपी म्हणून निष्पन्न झाल्या असून त्या  फरार आहेत , संदीप कोतकर नाशिक येथील कारागृहात शिक्षा भोगत आहेत. औदुंबर बाळासाहेब कोतकर  याच्यासह काटातील सहभागी असलेल्या या तिघांना ‘सीआयडी ‘ कडून अटक केली जाईल . त्यानंतर त्यांची प्रथम  विचारपूस करून त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे. असे चार्जशीट मध्ये म्हंटले आहे.

मोबाईल मधील रेकॉर्डिंग ठरले महत्वपूर्णः

चार्जशीट मध्ये दाखवण्यात आलेल्या घटनाक्रमानुसार मोबाईल मध्ये  करण्यात आलेले ऑडिओ रेकॉर्डिंगची क्लिप या प्रकरणात महत्वपूर्ण ठरली आहे . तपासातून  निष्पन्न झालेल्या दोषारोपत्रातील घटनाक्रमानुसार, केडगावातील पोटनिवडणुकीत पराजित झालेल्या गटाचे संजय कोतकर यांनी ७ एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास रवींद्र खोल्लम  याला फोन कॉल करून शिवीगाळ आणि धमकी देण्यात आली होती. त्यानंतर खोल्लम याने भानुदास महादेव कोतकर आणि सुवर्णा कोतकर या दोघांना फोन करून हा सर्व प्रकार सांगितला होता. त्यानंतर कोतकर याने खोल्लम याला त्याच्या कार्यालयात बोलावून घेत मोबाईलवरील रेकॉर्ड केलेल्या कॅलची क्लिप ऐकली. त्यातील हकीकत औदुंबर कोतकर याला सांगितली. औदुंबर याने खोल्लम व बी. एम. कोतकर याला सुवर्णा कोतकर हिच्या घरी बोलावून घेतले. घरी गेल्यानंतर सर्व हकीकत सांगून सुवर्णा हिला त्याच्यातील संभाषण ऐकविण्यात आले. त्यानंतर सुवर्णा हिने जामिनावर बाहेर असलेले सासरे भानुदास कोतकर आणि कारागृहात कैदी असलेल्या संदीप कोतकर याला फोन करून माहिती सांगितली त्यांच्याकडून  मार्गदर्शन घेऊन  गुन्हेगारी काटा रचला.  त्यावेळी सुवर्णा कोतकर, बी. एम. कोतकर, रवींद्र खोल्लम, विशाल कोतकर, औदुंबर कोतकर हे एकाच छताखाली होते, असे मोबाईल टॉवर लोकेशनवरून स्पष्ट होते, असा उल्लेख चार्जशीटमध्ये करण्यात आलेला आहे.
[amazon_link asins=’B00WJI7MR0′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’48d6acaf-843d-11e8-a52f-e1ab855b29f6′]

विशाल कोतकर याने संदीप गुंजाळ ऊर्फ डोळश्या याला फोन करून कटात सामील करून घेतले. विशाल याने केलेल्या फोननंतर गुंजाळ हा दोन गावठी कट्टे व गुप्ती अशी शस्त्रे सोबत घेऊन खोल्लम याच्या घराकडे गेला. विशाल याने संदीप गुंजाळ तेथे गेल्याची खात्री केली. संदीप गिर्‍हे व महावीर ऊर्फ पप्पू मोकळे हे तेथे आले व पाहणी करीत होते. त्यानंतर खोल्लम यास संजय कोतकर हे फोन करून म्हणाले की, ‘मंदिराजवळ येऊन थांब. मी आलोच तिथे भेटायला.’ काही वेळात संजय कोतकर व वसंत ठुबे हे दोघे आले व काही वेळातच या दोघांची हत्या करण्यात आली.