अब आएगा ‘मजा’, सबका ‘हिसाब’ होगा : नितेश राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांचा जीवनपट लवकरच उलगडणार आहेत. नारायण राणे सध्या आत्मचरित्र लिहीत असून लवकरच त्याचे प्रकाशन होईल अशी माहिती त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. आता नारायण राणे यांच्या आत्मचरीत्रात नेमका काय उल्लेख असेल, शिवसेनेबाबत ते आत्मचरीत्रात काय लिहिणार, आत्मचरीत्रात मोठ्या नेत्यांबाबत काही गौप्यस्फोट करणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे की , माझे मार्गदर्शक आणि वडील नारायण राणे यांचे आत्मचरीत्र येणार असून अब आएगा मजा, सबका हिसाब होगा. अब आयेगा मजा, सबका हिसाब होगा अशा शब्दांमध्ये त्यांचे पुत्र नितेश राणे यांनीच आत्मचरीत्राचं वर्णन केलं असल्यामुळे नारायण राणे करणार भल्याभल्यांची पोलखोल करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नारायण राणे हे एक महत्वकांशी नेते म्हणून ओळखले जातात. एक चाळीत राहणाऱ्या कुटुंबातील मुलगा ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा लांबचा टप्पा नारायण राणे यांनी गाठला आहे. राणे यांनी १९७२ मध्ये शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. ३ जुलै २००५ ला त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली परंतु शिवसेनेतून जाताना राणे अनेक समर्थक घेऊन कॉंग्रेसमध्ये गेले. ८ ऑक्टोबर २००८ साली नारायण राणे यांनी प्रहार नावाचे वृत्तपत्र सुरु केले. २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम करत ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या नवीन पक्षाची स्थापना केली. नारायण राणे यंदाच्या निवडणुकीत स्वबळावर रिंगणात उतरले असून सध्या ते राज्यसभेत खासदार आहे. भाजपाच्या पाठिंब्यावर ते राज्यसभेत गेले आहेत.

Loading...
You might also like