स्वाभिमानी संघटनेच्या दूध आंदोलनाला राष्ट्रवादीसह शिवसेनाचा देखील पाठिंबा

नागपूर : पाेलीसनामा ऑनलाईन

दूधाला योग्य दरवाढ मिळावी म्हणून खासदार राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली आहे. आता स्वाभिमानीच्या आंदोलनाला शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षा समोरील अडचणीत चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे.
[amazon_link asins=’B077TQDPVH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0f24159c-88f8-11e8-b09d-03f601b10db2′]

दुधाच्या मुद्यावरून विधानसभेत आज मोठा गोंधळ बघायला मिळाला. शिवसेनेच्या वतीने सुनील प्रभू आणि चंद्रदीप नरके यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना थेट पाच रुपये अनुदान देण्याची मागणी केली. विद्यामान सरकारमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवनेनं दूध आंदोलनाला पाठिंबा देत पुन्हा एकदा भाजपची कोंडी केली आहे.

तर  इकडे पुण्यामध्ये दूध आंदोलनाला पाठिंबा देत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भर पावसात आंदोलन केले. यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी प्रतिलिटरला केलेली पाच रुपये अनुदानाची मागणी योग्य असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. इतर राज्यातील दूध उत्पादनाचा विचार केला तर गुजरात सरकारने दुध उत्पादक शेतकऱ्यांना 300 कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले, तर महाराष्ट्र सरकारला काय अडचण आहे?  असा सवाल विचारत सुप्रिया सुळे यांनी  अनुदानाची मागणी केली.
[amazon_link asins=’B00KGZZ824′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1b54a8bd-88f8-11e8-a655-bf0c3e343b53′]

सरकारची बाजू सांभाळत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारे यांनी दूध संघच शेतकऱ्यांना दर देत नसल्याचा आरोप केला आहे.

एवढेच नाही तर सर्व दूध संघ या दोन्ही पक्षाकडे असल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसला यासाठी जबाबदार धरलं आहे.