राजू शेट्टींच्या संपत्तीत ५ वर्षांत ‘तिप्पट’ वाढ

हातकणंगले : पोलीसनामा ऑनलाईन – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात १ कोटी ५२ लाख ६० हजार २६३ रुपयांनी वाढ झाली आहे. टक्केवारीच्या तुलनेत त्यांच्या मालमत्तेत तिप्पट वाढ झाली आहे. लोकसभा निवडणूकीसाठी राजू शेट्टी यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या संपत्तीच्या विवरणाच्या प्रतिज्ञापत्रातून ही बाब उघड झाली आहे. राजू शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

राजू शेट्टी यांची २०१४ साली एकूण मालमत्ता ८३ लाख ८७ हजार ७० रुपये होती. त्या संपत्तीत वाढ होवून २०१९ साली ती संपत्ती २ कोटी ३६ लाख ४७ हजार ३३३ रुपये एवढी झाली आहे. टक्केवारीच्या तुलनेत त्यांच्या मालमत्तेत तिप्पट वाढ झाली आहे.

आज (गुरुवारी० कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेऊन राजू शेट्टी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी-स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मोठे शक्ती प्रदर्शन करत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर आदी नेते मंडळी उपस्थित होती.

Loading...
You might also like