Swadeshi Diwali | भारतात यावर्षी साजरी केली जाईल स्वदेशी दिवाळी, कॅटचा अंदाज; चीनला बसणार मोठा झटका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   Swadeshi Diwali | कोरोनानंतर सातत्याने चीनी वस्तूंवर (Chinese products) बहिष्काराचे (Boycott Chinese Product) आवाहन करत असलेले व्यापारी यावेळी चीनला मोठा झटका बसण्याचा अंदाज लावत आहेत. देशभरातील व्यापारी कोविड महामारी (Covid Pandemic) मुळे अगोदरपासूनच खुप दबावात होते परंतु आता दिवाळीच्या काळात देशभरातील बाजारात ग्राहकांची संख्या वाढत असल्याने व्यापार्‍यांची आशा वाढत आहे. इतकेच नव्हे यावेळी व्यापार्‍यांचे म्हणणे आहे की देशात स्वदेशी दिवाळी (Swadeshi Diwali) साजरी केली जाईल.

 

कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (Confederation of All India Traders – CAIT) चे म्हणणे आहे की,
दिवाळी सणाच्या विक्री कालावधी दरम्यान ग्राहकांकडून होणार्‍या खर्चाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत जवळपास 2 लाख कोटी रुपयांच्या भांडवलाचा ओघ वाहू शकतो. कॅटने म्हटले की,
मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कॅटने चीनी वस्तूंवर बहिष्काराचे आवाहन (Swadeshi Diwali) केले आहे.

 

तसेच देशातील व्यापारी आणि आयातदारांनी चीनकडून आयात बंद केली आहे.
ज्यामुळे या दिवाळी सणात चीनला सुमारे 50 हजार कोटी रुपयांचा व्यापारी तोटा होणार आहे.
यासोबतच आणखी एक महत्वाचा बदल हा आहे की मागच्या वर्षीपासून ग्राहक सुद्धा चीनी वस्तू खरेदी करण्यात रस दाखवत नाहीत.
यामुळे भारतीय वस्तूंना मागणी वाढण्याची पूर्ण शक्यता आहे.

कॅट राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीय आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल (CAT National President b. C. Bhartiya and National Mahamantri Praveen Khandelwal) यांनी म्हटले की,
कॅटची रिसर्च शाखा कॅट रिसर्च अँड ट्रेड डेव्हलपमेंट सोसायटी (CAT Research and Trade Development Society) कडून अलिकडेच विविध राज्यांच्या 20 शहरांना ज्यांना कॅटने वितरण शहराचा दर्जा दिला आहे.
या शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात हे तथ्य समोर आले की, यावर्षी आतापर्यंत भारतीय व्यापारी किंवा आयातदारांकडून दिवाळीच्या वस्तू, फटाके किंवा इतर वस्तूंची कोणतीही ऑर्डर चीनला देण्यात (Swadeshi Diwali) आलेली नाही.

 

परिणामी ही दिवाळी शुद्धप्रकारे हिंदुस्तानी दिवाळी म्हणून साजरी केली जाईल. ही 20 शहरे नवी दिल्ली, अहमदाबाद, मुंबई, नागपुर, जयपुर, लखनऊ, चंदीगढ, रायपुर, भुवनेश्वर, कोलकाता, रांची,
गुवाहाटी, पाटणा, चेन्नई, बेंगळुरू, हैद्राबाद, मदुरै, पाँडेचेरी, भोपाळ आणि जम्मू (New Delhi, Ahmedabad, Mumbai, Nagpur, Jaipur, Lucknow, Chandigarh, Raipur,
Bhubaneswar, Kolkata, Ranchi, Guwahati, Patna, Chennai, Bengaluru, Hyderabad, Madurai, Pondicherry, Bhopal and Jammu) आहेत.

 

कॅटचे म्हणणे आहे की, दरवर्षी रक्षाबंधनपासून नवीन वर्षापर्यंत 5 महिन्यांच्या सणासुदीच्या काळात भारतीय व्यापारी आणि आयातदार चीनकडून सुमारे 70 हजार कोटी रुपयांचा माल आयात करतात.
चीनी वस्तूंवरील बहिष्काराचे कॅटचे आवाहन यावर्षी चीनी व्यापारासाठी एक मोठा झटका ठरणार आहे आणि या मागणीच्या पूर्ततेसाठी देशभरातील व्यापार्‍यांनी आपल्या दुकांनासाठी पुरेशा वस्तूंचा बंदोबस्त केला आहे.

 

या भारतीय वस्तूंचा करण्यात आला स्टॉक

 

भारतीय आणि खंडेलवाल यांनी सांगितले की, प्रमुख रिटेल सेक्टर जसे की, एफएमसीजी वस्तू, ग्राहकपयोगी वस्तू, खेळणी, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स,
विद्युत उपकरणे आणि अ‍ॅक्सेसरीज,स्वयंपाकघरातील वस्तू आणि अ‍ॅक्सेसरीज, भेटवस्तू, वैयक्तिक वापराच्या वस्तू, कन्फेक्शरी आयटम, होम फर्निशिंग,
टेपेस्ट्रीज, भांडी, बिल्डर्स हार्डवेअर, फुटवेअर, घड्याळे, फर्निचर, कपडे,फॅशनेबल कपडे, गृहसजावटीच्या वस्तू, मातीचे दिवे, देवता, वॉल हँगिंग्ज,
हस्तकला वस्तू, कापड, शुभलाभ, सौभ्याग्याचे प्रतीक जसे ओम, लक्ष्मी आणि इतर देवी देवतांच्या बनवलेल्या वस्तू,
सजावटीच्या वस्तू इत्यादी प्रमुख क्षेत्र आहे.
जिथे चीनी वस्तूंऐवजी व्यापार्‍यांनी ग्राहकांच्या मागणीनुसार भारतीय वस्तूंचा पुरेसा स्टॉक केला आहे.

 

Web Title : Swadeshi Diwali | confederation of all india traders hopes swadeshi diwali this year and big loss to chinese trade

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pandharpur NCP | काय सांगता ! होय, NCP च्या पदाधिकार्‍यानेच केली राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात ईडीकडे तक्रार

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 1,584 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Chandrakant Patil | ‘क्रांती रेडकरच नाही तर मलाही बाळासाहेबांची आठवण येते’ – चंद्रकांत पाटील