अभिनेत्री जायरा वसीमच्या निर्णयावर स्वामी चक्रपाणी महाराज यांचे ‘मोठं’ वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जायरा वसीमने चित्रपटलासृष्टीला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयामुळे देशभरात एक वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे. जायराच्या हा निर्णयाला लोक धर्माचे वळण देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर काही लोक या निर्णयाची चर्चा करत आहे तर काही लोक या निर्णयाचे कौतुक करत आहे.

अभिनेत्री जायरा वसीमच्या या मोठ्या निर्णयावर अखिल भारतीय महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराजने समर्थन केले आहे. ते म्हणाले की, ‘प्रत्येक अभिनेत्रीने जायराकडून प्रेरणा घेतली पाहिजे. अभिनेत्री जायरा वसीमने बॉलिवूड सोडण्याचा जो निर्णय घेतला आहे तो कौतुकास्पद आहे. हिच्याकडून हिंदू अभिनेत्रींनी प्रेरणा घेतली पाहिजे. ‘

ते पुढे म्हणाले की, ‘माझी अशी इच्छा आहे की पुर्ण जग धार्मिक बनले पाहिजे. असे झाल्यास कोणताच धार्मिक व्यक्ती अधर्माच्या मार्गावर चालणार नाही. मी जायराच्या निर्णयाचे समर्थन करतो आणि हिंदू अभिनेत्रींना अपील करतो की, जायराकडून काहीतरी शिका.’

स्वामी चक्रपाणी महाराज एवढेच बोलून थांबले नाही ते पुढे म्हणाले की, ‘ज्या चित्रपटांमध्ये ब्राह्मणला चुकीचे दाखविले जाते किंव्हा कोणत्या धर्म संप्रदाय व जातीवर निशाना साधला जात असेल. तेव्हा हिंदू अभिनेत्रींनी या चित्रपटांमध्ये काम करण्यास नकार द्यावा. ज्याप्रमाणे मीटू प्रकरणामध्ये सगळ्या अभिनेत्री समोर आलेल्या होत्या आणि आरोपीचे नाव सगळ्यांसमोर आणले होते. तसेच धर्माच्या विरोधात असलेल्या चित्रपटांना विरोध करण्यासाठी अभिनेत्री पुढे आल्या पाहिजे.’

आरोग्यविषयक वृत्त

छोट्या दुखण्यांकडे करू नका दुर्लक्ष, मोठ्या आजाराचे असू शकते लक्षण

पस्तिशीनंतर गर्भधारणेत येतात अनेक अडचणी, जाणून घ्या कारणे

‘वजन’ कमी करण्यासाठी योग्य ‘आहार’ ठरतो परिणामकारक

सिनेजगत

Video : अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत ‘बोल्ड’ सीन करताना ‘हा’ अभिनेता ‘आऊट ऑफ कंट्रोल’ !

Photo : अभिनेत्री जया प्रदा यांनी यापुर्वी देखील सहन केल्या आहेत ‘तशा’ टिका, पहा फोटो

Video : चित्रपटाच्या सेटवर ‘ढसा-ढसा’ रडला कार्तिक आर्यन