स्वामी चिन्मयानंदनं आरोप स्विकारले, विद्यार्थीनीला मसाजला बोलावण्यावर व्यक्‍त केला ‘खेद’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बीजेपीचे माजी गृह राज्य मंत्री स्वामी चिन्मयानंद यांना एसआयटीच्या पथकाने लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याअंतर्गत अटक केली होती. एसआयटीचे मुख्य अधिकारी नवीन अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार चिन्मयानंद यांनी आपले आरोप कबुल केले आहेत.

चिन्मयानंद यांनी आपल्यावर असलेल्या बॉडी मसाज आणि अश्लील संभाषणाबाबत कबुली दिली आहे. याबाबत त्यांना अधिक काही बोलायचे नाही कारण केलेल्या कृत्याची त्यांना लाज वाटत आहे अशी माहिती अरोरा यांनी दिली.

लैंगिक अत्याचारामुळे आरोपी चिन्मयानंद यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूर येथील स्थानिक कोर्टाने चिन्मयानंदला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले. यापूर्वी लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या स्वामी चिन्मयानंद यांना अनेक दिवसांच्या संघर्षानंतर शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली होती.

शाहजहांपुर येथील चिन्मयानंद यांच्यावर एका लॉ च्या विद्यार्थिनीने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. तसेच त्या विद्यार्थीनीच्या वडिलांकडून याबाबतचे सर्व पुरावे पोलिसांच्या स्वाधीन केले होते. त्यानंतर एसआयटीने कारवाई करत चिन्मयानंद यांना अटक केली होती.

मुमुक्षु आश्रमातील दिव्यधाम या ठिकाणाहून चिन्मयानंद यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना शहजानपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी नेण्यात आले. चिन्मयानंद यांच्या वकील पूजा सिंह यांनी पीटीआयला सांगितले की एसआयटीची टीम मोठ्या संख्येने पोलिस दलासह दिव्यधाम येथे पोहोचली आणि चिन्मयानंद यांना अटक केली.

Visit – policenama.com