स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या ऑनलाइन परीक्षेत भोंगळा कारभार !

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड 15 ऑक्टोबर 2020 पासून 160 फॅकल्टी च्या परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जात आहेत विद्यापीठाने सकाळी 11:30 चा वेळ दिला पण एक तास उलटून गेला तरीही एक्झाम दिसत नाही विद्यापीठाशी संपर्क केले असता विद्यापीठ सांगत आहे की आपण परीक्षा प्रमुखाशी बोलून घ्यावं.

परीक्षा प्रमुख डॉ. सरोदे, डॉ. तंगणवाड, डॉ‌.त्रिभुवणी हे असून यांना कॉल केले असता कॉल उचलण्यास तयार नाहीत आणि कॉलेजला विचारणा केली असता कॉलेज वाल्यांना कुठल्याच प्रकारची एक्झाम विषयी माहिती नाही. या सर्व प्रकाराचा पश्चाताप विद्यार्थ्यांना भोगावा लागत आहेत.

विद्यापीठाचे कुलगुरु भोसले सर यांनी या गोष्टीवर लवकरात लवकर लक्ष घालून विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर कराव्यात अशी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे. जर विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहत असेल तर तपास करण्याची जबाबदारी ही विद्यापीठाने घ्यावी. जर ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठ सक्षम नसेल तर एक्झाम या ऑफलाइन पद्धतीने घ्याव्यात अशी विद्यार्थी वर्गांची मागणी आहे.