स्वामी समर्थ विवाहित होते…? थेट सातवा वंशज असल्याच्या दाव्याने खळबळ 

बारामती : पाेलीसनामा ऑनलाईन

अक्कलकोटचे श्री. स्वामी समर्थ महाराज हे इसवी सनाच्या १८ व्या शतकात होऊन गेलेले, महाराष्ट्रातील  दत्त संप्रदायातील एक थोर संत होते. स्वामी समर्थ विवाहित होते तसेच आपण महाराजचं थेट सातवा वंशज असल्याचा दावा येथील वैभव रतन गोसावी (भारती)  राहणार वडापूरी (ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी केला आहे. याबाबत गोसावी यांनी सोलापुर येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. अ‍ॅड. हेमंत होळकर यांच्यामार्फत दावा दाखल केला असून  या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.  वैभव गोसावी सध्या पिठाची गिरणी चालवितात तसेच शेतमजुरी करतात.
[amazon_link asins=’B071HWTHPH,B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0c66e45a-b687-11e8-9490-f79f1e310ee2′]

या दाव्यात वैभव गोसावी  यांनी  मुख्य सचिव, मंत्रालय मुंबई, श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर ट्रस्ट अक्कलकोट, धार्मिक प्रकाशन संस्था १७३ एफ, गिरगाव रोड, गिरगाव मुंबई, पुण्याचे अनमोल प्रकाशन यांना प्रतिवादी केले आहे. या प्रतिवादी ३ व ४ या प्रकाशन संस्थांनी अनुक्रमे श्री. स्वामी समर्थ महाराजांचे आद्य बखर तसेच श्री. स्वामी समर्थ हे ग्रंथ प्रकाशित केले आहेत. या ग्रंथामध्ये श्री. स्वामी समर्थ महाराज जन्मशून्य होते. ते कर्दळीवनातून प्रकट झाले होते. ते संन्यासी व ब्रह्मचारी होते. ब्राम्हण जातीचे असावेत. वगैरे खोटा मजकूर लिहिला आहे. त्यातून श्री. स्वामी समर्थ महाराज त्यांचे आई वडिल त्यांचे कुटुंब आणि वंशजांचा अवमान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

तसेच हा मजकूर आमच्या पूर्वजांच्या व आमच्या चारित्र्याशी व सामाजिक स्थानाशी निगडीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे वैभव  गोसावी  यांनी ते स्वामी समर्थ महाराज यांचे थेट वंशज असल्याचा जाहीर ठराव करण्याची मागणी केली आहे. तसेच प्रतिवादी हे वादीच्या परवानगीशिवाय श्री. स्वामी समर्थ महाराज यांच्या नावाचा मुर्त्यांचा, समाधीस्थळाचा वापर करू नये यासाठी दाव्यात मनाई हुकुम मागितला आहे. दाव्याच्या पृष्ठ्यर्थ त्यांनी मोडी लिपीतील अनेक पत्रे, वंशावळ, जमिनीची कागदपत्रे व पत्रव्यवहार इत्यादी अनेक पुरावे दाव्यासोबत जोडले आहे.
[amazon_link asins=’B01DU5OJCQ,B01MU4PM6P’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1bf5e4ed-b687-11e8-a24c-35264b15410f’]

श्री स्वामी समर्थांचे नाव चंचल भारती असे होते. याबाबत स्वामींच्या ग्रंथामध्ये देखील उल्लेख करण्यात आला आहे. ते मुळ वडापुरी (ता. इंदापुर, जि. पुणे) येथील रहिवासी होते. त्यांच्या मुलाचे नाव भगवान असे होते. स्वामींच्या एका नातेवाईकाने त्यांच्या मुलाला पाठविलेल्या लग्नपत्रिकेवर देखील भगवान चंचल भारती असा उल्लेख देखील आहे. ही पत्रिका त्यांच्याकडे उपलब्ध आहे. १९१७ साली भगवान भारती यांचा तापसरी आजाराने मृत्यू झाल्याचा दावा त्यांचे वंशज गोसावी यांनी केला आहे. स्वामी समर्थांच्या इतिहासाविषयी संशोधनाची आवश्यकता असल्याचे गोसावी यांनी सांगितले.

जाहिरात

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.