‘पेहचान कौन’ ! ‘या’ दोन सौंदर्यवती आहेत दिग्गज अभिनेत्यांच्या मुली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या एक फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. तु्म्हाला माहित नसेल परंतु या फोटोत दिसणाऱ्या दोघी मराठी इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्यंच्या मुली आहेत ज्या एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. दिवगंत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि जयवंत वाडकर यांच्या मुलींचा हा फोटो आहे. जसे लक्ष्मीकांत बेर्डे आणि जयवंत वाडकर दोघे खूप जवळचे मित्र होते तसेच या दोघीही एकमेकांच्या जवळच्या मैत्रिणी आहेत. लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मुलीचे नाव स्वानंदी आहे तर जयवंत वाडकर यांच्या मुलीचे नाव स्वामिनी आहे.

स्वानंदी आणि स्वामिनी यांचे हे फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोवर त्यांच्या चाहत्यांकडून प्रतिक्रिया येताना दिसत आहे. त्यांच्या अनेक चाहत्यांनी हे फोटो लाईक केले आहेत. अनेकांनी यावर कमेंट करत त्यांच्या लुकवरून तसेच मैत्रीमुळे त्यांचे कौतुक केले आहे.

View this post on Instagram

Rise and Slay❤✨

A post shared by Swanandi L Berde (@swanandiberde) on

स्वामिनीविषयी थोडक्यात…

जयवंत वाडकर यांची लाडकी लेक स्वामिनीने एफयु या सिनेमातून सिनेजगतात पाऊल टाकले आहे. स्वामिनीला तुम्ही आशिकी या सिनेमातही पाहिले आहे. स्वामिनीला अभिनयाची आवड तर आहेच सोबत तिला नृत्य करायलाही फार आवडते.

स्वानंदीविषयी थोडक्यात…

लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदीच्या डेब्यूची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. किशोर बेळेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या रिस्पेक्ट या सिनेमातून स्वानंदी मराठी सिनेसृष्टीत पाऊल टाकणार अशीही चर्चा होती. सात महिलांची गोष्ट असलेल्या रिस्पेक्ट या सिनेमात सातपैकी एका स्त्रीची भूमिका स्वानंदीने साकारली आहे असेही समजत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like