‘स्वानंदी’कडून आणखी एक ‘विक्रम’, वयाच्या 9 व्या वर्षी कोकण कडा ‘सर’ !

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – अवघ्या नऊ वर्षाच्या स्वानंदीने करुन दाखवलं अस की जे अनेकांना केवळ स्वप्नवत असे तिने सर केला कोकनकडा आणि घडवला एक नवा विक्रम. आपल्या राज्यात अनेक रणरागिणी आहेत त्यांनी अनेक इतिहास रचले यामागे त्यांची जिद्द व चिकाटी होती अशीच त्याच्यात शोभेल अशी नऊ वर्षाची स्वानंदी सचिन तुपे होय.

पुणे सोलापूर महामार्गावरील कुंजीर वाडी या छोट्याशा गावात राहून चौथीत शिकणारी ही लहानगी.तिने आत्तापर्यंत सह्याद्री पर्वत रांगेतील अनेक गड-किल्ले सर केले आहेत. लिंगाणा गड हा अत्यंत अवघड श्रेणीतील समजला जाणारा गड तिने सर केला आहे. तिचे वडील सचिन तुपे व काका पंडित झेंडे यांच्या बरोबर तिची भटकंती सुरू असते.

दि.9 डिसेंबर रोजी खीरेश्वर येथुन सायंकाळी सहा वाजता तिने हरिश्चंद्र गड चढण्यास सुरुवात केली. रात्री साडे नऊ वाजता ती गडावर पोहचली. तेथे रात्री चा मुक्काम करून दुसऱ्या दिवशी पहाटे कोकण कड्यावर पोहचली. सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान ती व तिचे वडील सचिन तुपे यांनी कोकणकड्या वरून रॅपलिंग करायला सुरुवात केली. पहिला टप्पा हा नवशे फुटांचा पार करायला तिला अर्धा तास लागला. हा टप्पा पूर्ण (ovarhang) म्हणजे लटकत खाली जाणे असा आहे.

त्यानंतर दुसरा टप्पा हा सहाशे फुटांचा आहे. तो तिने दहा मिनिटांत पार केला, हा ही टप्पा थोडा लटकताच आहे. तिसरा टप्पा तीनशे फुटांचा आहे. हा टप्पा सोपा आहे, तिने आठ मिनिटांत पार केला. येथुन पुढे खरी कसरत चालू झाली. कारण येथून बेलपाडा पर्यंत जाणारी वाट अतिशय अवघड असून वाटेत मोठमोठ्या दगडांची वाट पार करून जावे लागते. अंदाजे दगडांवर पाय ठेऊन जिथे वाट दिसेल तेथे पाय ठेऊन पुढे जावे लागते. अतिशय कष्टदायक व सत्व परीक्षा पाहणारी वाट चालून जवळपास साडे पाच तासांचे पदभ्रमण करून रात्री साडे नऊ वाजता बेलपाडा येथे पोहचली.

या मोहिमेचे आयोजन अनिल वाघ याने केले. त्याच्या सोबत दीपक विशे, सिंघम व गणेश गायकवाड संग्राम धुमाळ यांनी अनिल यांना साथ दिली.एकूण दहा सदस्यांनी कोकण कडा हा १८०० फुटांचा टप्पा रॅपलिंग करीत पार केला. अश्या पद्धतीने अवघ्या नऊ वर्षाच्या हिरकणी स्वानंदि सचिन तुपे हिने न भूतो न भविष्यती मोहीम पार करुन या ठिकाणी प्रथमच नऊ वर्षाच्या मुलीने १८०० फुटांचे रॅपलिंग केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/