Swapnil Lonkar Suicide | स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांचं 20 लाखांचं कर्ज भाजपानं फेडलं, फडणवीसांच्या हस्ते धनादेश सुपूर्द

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  एमपीएससी (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील नोकरी न मिळाल्याने पुण्यात एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. मात्र, स्वप्नील लोणकर (वय, 24) असं त्या तरुणाचं नाव आहे. स्वप्निलच्या आत्महत्यांनंतर (Swapnil Lonkar Suicide) एमपीएससी नियुक्त्यांबाबत प्रकरण समोर आलं आहे. यावरून राज्यात खळबळ उडाली. यांनतर अनेक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी राज्य शासनावर ताशेरे ओढले. आत्महत्या करण्याआधी स्वप्नीलने आपल्यावर कर्जाचा डोंगर असल्याचं सांगितलं. यावरून आता भाजप (BJP) स्वप्निलच्या (Swapnil Lonkar Suicide) कुटुंबीयांच्या मदतीसाठी धावला आहे. भाजपने 19 लाख 96 हजारांच्या थकित कर्जाची परतफेड केली आहे.

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आज (22 जुलै) वाढदिवसाचे औचित्य साधून फडणवीसांच्या हस्ते धनादेश (Check) लोणकर कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला.
19 लाख 96 हजार 965 रूपयांच्या कर्जाची परतफेड करणारा धनादेश (Check) आज देवेंद्र फडणवीस यांनी सुपूर्द केला आहे.
एमपीएससी (MPSC) परीक्षा पास होऊन सुद्धा मुलाखती होत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांवर असलेल्या 19 लाख 96 हजार 965 रूपयांच्या कर्जाची परतफेड भाजपने (BJP) केली आहे.

दरम्यान, स्वप्निलचे वडिल सुनील तात्याबा लोणकर यांना हा कर्जाच्या रकमेचा चेक (Check) दिला. शिवशंकर ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्यादित या संस्थेचे लोणकर कुटुंबीयांवर कर्ज होते.
त्यातून घरातील प्रिटींग प्रेस बंद आणि अशात पतसंस्थेकडून कर्जाचा बोजा असल्याने हे
कुटुंब त्रस्त झाले होते. अखेर या कर्जाची रक्कम भपणे फेडली आहे.
यामुळे लोणकर कुटुंबियांना एक दिलासा दिला आहे.
यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar),
गिरीश महाजन (Girish Mahajan), गोपीचंद पडाळकर (Gopichand Padalkar),
मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) आणि अन्य नेते देखील उपस्थित होते.

Web Title : Swapnil Lonkar Suicide | bjp repaid rs 20 lakh debt of swapnil lonakar family

Pegasus | फडणवीस यांच्या कार्यकाळातील टेलीफोन टॅपिंगची चौकशी करा; नागपूरचे वकील अ‍ॅड. सतिश उके यांची मागणी

Pune Crime | महाराष्ट्र सरकारच्या स्कीममधून जमीन विकत घेऊन देण्याचं दाखवलं आमिष, 28 लाखाच्या फसवणूक प्रकरणी महिला अटकेत

Lok Janshakti Party | लोकजनशक्ती पार्टीचे 23 जुलैला ‘माझे रेशन, माझा अधिकार’ धरणे आंदोलन