Swapnil Lonkar suicide Case | ‘माझा तळतळाट लागेल, एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी मग त्यांना कळेल’, स्वप्निलच्या आईचा आक्रोश !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Swapnil Lonkar suicide Case – ‘माझ्या मुलाने परीक्षा दिली होती, त्याची मुलाखत (Interview) होत नव्हती, त्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचलले. माझा तळतळाट आहे की, एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी (minister’s son should commit suicide), तेव्हा या सरकारला कळेल मुलगा (losing a son) जाण्याचे दु:ख काय असते’ असं म्हणत स्वप्निल लोणकरच्या (Swapnil Lonkar) आईने आक्रोश केला.Swapnil Lonkar Sucide Case | mpsc student swapnil lonkar sucide case the son of a minister should commit suicide said swapnils mother

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (MPSC Exam) उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी (JOB) मिळाला नसल्याने तणावातुन व आर्थिक परिस्थितीमुळे स्वप्नील सुनील लोणकर Swapnil Sunil Lonakar (वय-24 रा. गंगानगर, फुरसुंगी) या विद्यार्थ्याने (Student) गळफास घेऊन आत्महत्या (commit suicide) केली. स्वप्नील लोणकर (Swapnil Sunil Lonakar) यांचे वडील सुनील लोणकर यांचा शनिवार पेठेमध्ये (Shaniwar Peth) बिल बुक (Bill Book) बनवण्याचा लहान प्रिटींग प्रेसचा (Printing press) व्यवसाय आहे. याठिकाणी ते आणि स्वप्नीलची आई दोघेजण काम करतात. तर स्वप्नील याने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त (Degree in Civil Engineering) केली आहे. पूर्व आणि मुख्य परीक्षा (Pre and main exam) उत्तीर्ण होऊन केवळ मुलाखत (Interview) न झाल्याने नोकरी मिळू शकली नाही. याच तणावातून स्वप्नील लोणकर (Swapnil Lonakar) याने आत्महत्या (commit suicide) केली.

त्यांनी दुसऱ्याच्या मुलाचाही विचार करावा

स्वप्निल बद्दल बोलताना त्याच्या आईच्या डोळ्याती अश्रू थांबत नव्हते.
आज माझ्या मुलाच्या जागी एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या केली असती तर (If the minister’s son had committed suicide) मंत्र्याला जाग आली असती का ? माझा मुलगा हुशार होता.
त्याने चांगले शिक्षण घेतलं होतं (He was well educated).
माझा तळतळाट आहे की, एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी, मग यांना समजेल मुलाच्या जाण्याचे दु:ख काय असते ते.
यांनी दुसऱ्यांच्या मुलांचाही विचार करावा, त्यांच्यावर काय परिस्थिती ओढावली असेल हे कळेल,
असे म्हणत स्पप्निलच्या (Swapnil Lonakar) आईने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.

राजकारण्यांमध्ये नुसती भाडणं सुरु

या राजकारण्यांमध्ये नुसती भांडणे सुरु आहेत, त्यांना कुणाशी काहीही देणं घेणं नाही.
कुणाला काय त्रास होतोय, हे त्यांना काय माहिती.
त्यांना फक्त राजकारणाचे (politics) पडले आहे. माझा स्वप्निल मला म्हणायचा, आई मुलाखत झाली नाही. परीक्षा पास झालोय पण दोन वर्षे झाली.
खूप झुरला माझा मुलगा, पण त्यांची मुलं सुरक्षित आहेत, म्हणून त्यांना गरिबांशी काहीही देणं-घेण नाही. लोकांच्या वेदना त्यांना कळणार नाहीत, असे म्हणत आईने टाहो फोडला.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

 

Web Title : Swapnil Lonkar suicide Case | mpsc student swapnil lonkar suicide case the son of a minister should commit suicide said swapnils mother

 

हे देखील वाचा

Anil Deshmukh | अनिल देशमुख यांच्यासह त्यांच्या मुलाला ईडीचे समन्स; 2 दिवस होणार चौकशी

भिवंडीतील निजामपुरा कसाई वाड्यात पोलिसांना बेदम मारहाण

Bhiwandi Crime News | आरोपीच्या मृत्युनंतर जमावाची पोलिसांना बेदम मारहाण; भिवंडीतील निजामपुरा कसाई वाडा येथील व्हिडिओ व्हायरल (Video)

Vasai Virar MNC Recruitment-2021 | वसई विरार महापालिकेत कायदे तज्ज्ञांची पदभरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख