Swapping Blood Sample-Sassoon Hospital | अपघातातील आरोपी मुलासाठी रक्त देणाराही पोलिसांच्या ‘रडार’वर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Swapping Blood Sample-Sassoon Hospital | कल्याणीनगर अपघात प्रकरणात (Kalyani Nagar Accident) आता नवनवे ट्विस्ट समोर येत आहेत. या अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. ससूनच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे (Dr Ajay Taware) आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर (Dr Shrihari Halnor) या दोघांनी मिळून अल्पवयीन आरोपीचे रक्त नमुने कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले होते. त्याऐवजी भलत्याच व्यक्तीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्याबाबत त्या दोन्ही डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली.(Swapping Blood Sample-Sassoon Hospital)

या अपघातातील आरोपी मुलासाठी रक्त देणाराही पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान दोन्ही डॉक्टरांना कोर्टात हजर केले असता युक्तिवाद करत पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए पांडे यांनी ती मान्य करत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

युक्तिवादादरम्यान सहायक सरकारी वकील ऍड . नीलेश लडकत (Adv Nilesh Ladkat) व ऍड. योगेश कदम (Adv Yogesh Kadam) म्हणाले की, ” बाळाला न्यायालयीन प्रक्रियेत मदत होण्याच्या उद्देशाने आरोपींनी शासकीय पदाचा गैरवापर करून कट रचत त्याचा रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट केला आहे. त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून हे केले? याबाबत त्यांच्याकडे चौकशी करायची आहे.

बाळाच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी कोणाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले? अपघाताचा गुन्हा घडल्यानंतर गुन्ह्यातील पुरावा
नष्ट करणे, शासकीय दस्तऐवजात फेरफार करणे, गुन्ह्याच्या अनुषंगाने बाळाला मदत करण्याच्या उद्देशाने कट
रचण्याच्या गुन्ह्यात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता आहे, त्यादृष्टीने तपास करायचा आहे.

या गुन्ह्यात आर्थिक व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्याअनुषंगाने आरोपींच्या घराची झडती घेऊन पंचनामा करायचा आहे.
त्यांच्या मोबाइलचे सायबर तज्ज्ञांमार्फत विश्लेषण करून त्याआधारे तपास करायचा आहे.

ससून रुग्णालयातील डीव्हीआर जप्त करण्याचे काम सुरू असून, घटनेच्या दिवशी त्यांना भेटण्यासाठी कोण-कोण आले
होते याचे सीसीटीव्ही फुटेज मिळवून त्याचा आरोपींकडे एकत्रित तपास करायचा आहे “, असा युक्तिवाद ऍड. लडकत व
ऍड. कदम यांनी केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dr Ajay Taware-Dr. Shrihari Halnor | डॉ. अजय तावरे व सहकार्‍यांवर ‘मोका’अंतर्गत कारवाई करून शासकीय सेवेतून निलंबित करा

Swapping Blood Sample-Sassoon Hospital | ससूनमधला ‘तो’ कर्मचारी गायब; पुणे पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासणार

Gurmeet Ram Rahim | हत्याप्रकरणात राम रहिमला दिलासा; हायकोर्टाकडून निर्दोष मुक्तता, CBI कोर्टाचा निर्णय रद्द

Talegaon Dabhade Pimpri Crime News | पिंपरी : आठवडे बाजारात सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्याला अटक

Porsche Car Accident Pune | पोर्शे टीमने डेटा मिळवला; बिल्डर मुलाची कुंडली मिळणार…