‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीचा आप, कम्युनिस्ट पार्टी आणि काँग्रेससाठी प्रचार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यंदाच्या निवडणुकांमध्ये एखाद्या बॉलिवूड सेलिब्रेटीला स्टार प्रचारक म्हणून प्रचार रॅलीत उतरवण्याचे फॅड जोमात आहे. अनेक सेलिब्रेटी आपल्या आवडत्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले आहे. अशीच एका बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिची यंदाच्या निवडणुकात राजकीय मंचावर विशेष उपस्थिती पाहायला मिळाली.

अभिनेत्री स्वरा भास्कर देशभर विविध राजकिय पक्षांचा प्रचार करण्यात व्यस्त आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्ली येथे आम आदमी पार्टी , बिहारमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा (सीपीआएम)आणि मध्य प्रदेशात काँग्रेसचा प्रचार करत आहे.

स्वरा भास्कर सर्वप्रथम बिहारच्या बेगुसराय मतदार संघातील सीपीआय चे उमेदवार कन्हैय्या कुमार यांच्या प्रचार रॅलीत दिसली होती. तिच्या या रोड शो आणि भाषणाची मोठी चर्चा झाली होती. बिहारनंतर स्वराने तिचा मोर्चा मध्य प्रदेशकडे वळवला. मध्य प्रदेशमधील भोपाळ लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या प्रचारसभेला स्वरा भास्करने हजेरी लावली. भोपाळध्ये तिने काँग्रेससाठी प्रचार केला.

अभिनेत्री स्वरा भास्कर विषयी …

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने आपल्या छोट्या छोट्या पण लक्षवेधी भूमिकांमधून प्रेक्षकांवर छाप पडली. २००९ सालापासून तिने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. स्वराला आजपर्यन्त २ फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. गुजारिश, तनू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा या चित्रपटात तिने भूमिका केल्या आहेत.