स्वरा भास्कर ‘शहीद स्मारक’वरील तोडफोडीच्या फोटोला म्हणाली Fake ! ट्रोल झाल्यानंतर केलं Tweet

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार स्वरा भास्कर नेहमीच इंडस्ट्रीशी संबंधित किंवा समाजातीलही काही मुद्द्यांवर भाष्य करताना दिसत असते. यामुळं अनेकदा ती वादातही सापडत असते. अलीकडे असंच काहीसं पाहायला मिळालं जेव्हा स्वरानं शहीद स्मारकवर झालेल्या तोडफोडीच्या जुन्या फोटोला फेक असल्याचं म्हटलं. असं करणं स्वराला एवढं महागात पडलं की, तिला लोकांनी प्रचंड ट्रोल केलं. स्वराला आपली चूक कळायला जास्त उशीर लागला नाही आणि तिनं लगेचच सुधारणा केली. इतकंच नाही तर तिनं तिची पोस्टही डिलीट केली. परंतु तोवर तिच्या पोस्टचे अनेक स्क्रीनशॉट सोशलवर व्हायरल झाले होते.

स्वरानं तिच्या ट्विटरवरून एक पोस्ट शेअर केली होती. यात तिनं एक फोटो शेअर केला होता. यात काही लोक शहीद स्मारकावर तोडफोड करत आहेत. या फोटोंना तिनं घटिया फोटोशॉप म्हणून संबोधलं होतं. परंत असं केल्यानं ती वादात सापडली. कारण हा फोटो फोटोशॉप नसून रिअल फोटो होता. 2012 मध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर झालेल्या दुर्दैवी घटनेचा हा फोटो होता.

जेव्हा सोशलवर स्वरा ट्रोल होऊ लागली तेव्हा तिला तिच्या चुकीची जाणीव झाली. यानंतर तिनं तिचं जुनं ट्विट डिलीट करत नवीन ट्विट केलं. यात तिनं लिहिलं की, सुधारणा : हा फोटो 2012 मधील मुंबईतील आझाद मैदानावरील आहे. लज्जास्पद कृती.

स्वराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ओटीटीवर प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईमवर रसभरी ही तिची वेब सीरिज अलीकडेच रिलीज झाली आहे. यातील काही सीनवरून वादही झाला. सीरिजमध्ये अनेक बोल्ड सीन्स आहेत. काहींना तर ही सीरिज अजिबात आवडली नाही. तिनं रांझना, तनू वेड्स मनू, नीलबट्टे सन्नाटा, वीरे दी वेडिंग अशा अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.