‘देशाला नव्या पंतप्रधानांची गरज…’; स्वरा भास्करचे ट्विट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री स्वरा भास्कर ही सोशल मीडियावर सतत अ‍ॅक्टिव्ह असते. आता तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वक्तव्य केले आहे. ‘देशवासियांना आपल्या प्रियजनांना श्वासासाठी तडफडत बघायचे नसेल तर देशाला नव्या पंतप्रधानांची गरज आहे, असे म्हटले आहे.

देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. वैद्यकीय सेवा-सुविधांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यावरून स्वरा भास्कर हिने ट्विट करून म्हटले, की ‘देशवासियांना आपल्या प्रियजनांना श्वासासाठी तडफडत बघायचे नसेल तर देशाला नव्या पंतप्रधानाची गरज आहे. स्वरा भास्करच्या या ट्विटनंतर तिला ट्रोल करण्यात आले. ‘2024 पर्यंत सहन कर. त्यानंतर तुला योगीजींना सहन करायचे आहे. आम्ही तर खुश आहोत. बाकी तू तुझे पाहा’. तसेच माफ कर पण 2024 आधी असे काहीही होऊ शकत नाही, असे एका युजरने तिला सुनावले. याशिवाय एका युजरने ही स्वरा भास्कर आहे तरी कोण? असा प्रश्न विचारत तिची खिल्ली उडवली.

दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी एक ट्विट केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना स्वरा भास्कर हिने मत व्यक्त केले. ‘देश चालत राहावा असे पीएमओला वाटत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका नव्या टीमची गरज आहे’, असेही तिने म्हटले आहे. देशातील आत्ताचे सर्व भीषण चित्र पाहून स्वरा भास्कर हिने मोदी सरकारवर निशाणा साधला.