Rhea Chakraborty News : रिया चक्रवर्तीच्या ‘मिडीया ट्रायल’वर भडकली स्वरा भास्कर, म्हणाली – ‘एवढं तर कसाबसोबत देखील झालं नव्हतं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिया चक्रवर्तीबाबत सध्या सतत चर्चा होत आहे. सुशांतचे वडील केके सिंह यांनी रियाविरूद्ध एफआयआर दाखल केली आहे. यानंतर काही ना काही सतत समोर येत आहे. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. अलीकडेच रियाचे ड्रग्ज माफियाशी असलेले संबंधही समोर आले आहेत. याशिवाय सोशल मीडियापासून टीव्हीपर्यंत रियाबाबत बर्‍याच चर्चा आहेत. या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करची प्रतिक्रिया समोर आली आहे. तिने नाराजी व्यक्त करत तिची तुलना कसाबसोबत केली आहे.

स्वरा भास्करने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर लिहिले- ‘मला नाही वाटत की कसाबही मीडियावर अशा Witch Hunt चा विषय ठरला असेल. ज्याप्रकारे रिया चक्रवर्ती मीडिया ट्रायलला सामोरे जात आहे. भारतीय माध्यमांना लाज वाटली पाहिजे… ज्यांना हा विषारी उन्माद मिळाला आहे. अशा जनतेची आम्हाला लाज वाटते.’

या मुद्यावर स्वराने यापूर्वीही रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ लिहिले आहे. सुप्रीम कोर्टाने सुनावणी घेण्यापूर्वी तिने लिहिले होते- ‘रिया एका विचित्र आणि धोकादायक मीडिया ट्रायलला बळी पडली आहे, ज्याचे नेतृत्व जमावाकडून होत आहे. मला आशा आहे की, माननीय सर्वोच्च न्यायालय याची दखल घेईल आणि बनावट बातम्यांचा प्रसार आणि जे षडयंत्रांच्या गोष्टी सांगतात त्यांच्यावर बंदी आणेल. कायद्याला ठरवू द्या.’

सीबीआय सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे. त्याचबरोबर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या प्रकरणाचा तपास करत आहे. तसेच आता ड्रग्सबाबत माहिती समोर आल्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) गुन्हा दाखल केला आहे. यावर ते स्वत:चा स्वतंत्र तपास करतील.