एकेरी बोलल्यानं युजरवर ‘भडकली’ स्वरा भास्कर, म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : अलीकडेच अभिनेत्री स्वरा भास्कर हिनं टिकटॉकवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून टिकटॉकवर काही व्हिडीओज व्हायरल होत आहे ज्या परफॉर्मर एका मुलीच्या चेहऱ्यावर काही लिक्विड फेकत आहेत. अ‍ॅसिड अटॅकला प्रोत्साहन देणारा हा व्हिडीओ असल्याचा आरोप होत आहे. यावर स्वरा म्हणत आहे की, जो कंटेट महिलांवरील हिंसेला प्रमोट करत आहे अशा कंटेटला टिकटॉक प्रोत्साहन कसं देऊ शकतं.

एकानं स्वरावर पलटवार केला आहे. त्यानं म्हटलं की, तुम्ही सिनेमात असं काही दाखवत नाहीत का. एकानं नरेटीव सेट केला तर तुम्ही त्याच्या मागेच लागलात. तो देखील अ‍ॅक्टींग करत आहे. मी फक्त तुला प्रश्न विचारत आहे त्यांना समर्थन देत नाहीये असंही त्यानं सांगितलं.

स्वरानं घेतला समाचार
स्वरानं त्या युजरला उत्तरही दिलं आणि त्याला संस्काराचा धडाही शिकवला आहे. स्वरानं त्याला रिप्लाय केला की, “तुम्हाला प्रश्न असं म्हणा, गुरप्रीतजी.. आदरानं बोला. आपण मित्र नाही आहोत.” त्याच्या प्रश्नाला उत्तर देत स्वरा म्हणते, “जेव्हा महिलेची थट्टा केली आहे किंवा लिंग आधारीत हिंसाचाराला प्रोत्साहन दिलं आहे तेव्हा नेहमीच लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तुम्हाला प्रश्नांबद्दल काय अडचण आहे. होय महिलांवरील हिंसा रोमँटीसाईज करणं चुकीचं आहे.