गुंजा कपूरवर स्वरा भास्करनं साधला ‘निशाणा’, म्हणाली – ‘तुला लाज वाटायला हवी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून सुरू असलेला गोंधळ देशात आजही कायम आहे. दिल्लीच्या शाहीन बागमध्ये गेल्या महिन्याभरापेक्षाही जास्त काळापासून धरणे आंदोलन सुरू आहे. नागरिकत्व कायदा आणि मोदी सरकार विरोधात सतत आवाज उठवणाऱ्या स्वरा भास्करनं पुन्हा एकदा शाहीन बागबद्दल मोठं विधान केलं आहे.

बुधवारी शाहीन बागमधील धरणे आंदोलनात गुंजा कपूर नावाची युट्युबर गेली होती. तिनं आपल्या बुरख्यामध्ये कॅमेरा लपवला होता. तिनं आंदोलन करणाऱ्यांना काही प्रश्न विचारले. परंतु जेव्हा महिलांना कॅमेऱ्याची चाहूल लागली यानंतर तिथे खूप गोंधळ झाला. यानंतर दिल्ली पोलिसांनी गुंजाला तिथून सुरक्षित बाहेर काढलं. यानंतर गुंजानं एक ट्विट केलं. ती ठिक आहे असं तिनं सांगितलं. ती आपल्या ट्विटमध्ये म्हणाली, “मी एकदम ठिक आहे. आपल्या सर्वांच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद. दिल्ली पोलिसांचे विशेष आभार ज्यांनी मला सुरक्षित बाहेर काढलं.”

स्वरानं साधला गुंजा कपूरवर निशाणा
गुंजा कपूरच्या या ट्विटनंतर स्वरा भास्करनं देखील ट्विट केलं आणि गुंजावर निशाणा साधला. स्वरा आपल्या ट्विटमध्ये म्हणाली, “तुला लाज वाटायला हवी गुंजा, तू आज सुरक्षित आहेस कारण ज्या महिलांना तू बदमान करायला निघाली होतीस त्यांनी तुला वाचवलं आहे. त्या महिलांच्या सहनशक्तीमुळे तू सुरक्षित आहेस.”