कन्हैया कुमारचा प्रचार करणं भोवलं, अभिनेत्री स्वरा भास्करला 4 मोठ्या ‘ब्रॅन्ड’नं केलं बाजूला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अभिनेत्री स्वरा भास्करला लोकसभा निवडणूकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार कन्हैया कुमारसाठी प्रचार करणे महागात पडले आहे. या कारणाने तिच्याकडून चार मोठ्या ब्रॅंडने काम काढून घेतले आहे. लोकसभा निवडणूकीत स्वरा भास्करने जेएनयू विद्यार्थी नेता आणि बिहारच्या बेगुसरायमधून उभ्या राहिलेला कन्हैया कुमार याला जाहीर समर्थन दिले होते. त्याच्या मतदार संघात जाऊन तिने प्रचार देखील केला होता.

स्वरा भास्कर आपल्या ‘शीरकोरमा’ या सिनेमाच्या पोस्टर लाँचिंग वेळी बोलताना म्हणाली की सध्या सामाजिक आणि राजकीय विषयावर सिनेमा बनवण्यावर बॉलिवूडवर थोडी जबाबदार झाली आहे. तिने आपल्या को स्टार दिव्या दत्ता आणि निर्देशक फराज आरिफ अंसारी यांंच्या बरोबर चर्चेदरम्यान सांगितले की बॉलिवूड यासाठी जबाबदार आहे की त्यांनी समाजाला काय दिले आहे.

स्वरा भास्कर म्हणाली की मी समजू शकते की ही योग्य वेळ आहे की बॉलिवूड आणि दुसऱ्या भाषांमधील सिनेनिर्मात्यांनी थोडे आधिक संवेदनशील झाले पाहिजे. कारण ही वेळ आहे की ज्याने फरक पडतो की सिनेनिर्माते कोणते मुद्दे उचलतात. आता गरज आहे की सिनेमांमध्ये धर्म, जाती आणि लैंगिक विषमतेवर बोलले पाहिजे.

स्वरा म्हणाली की, माझ्याबद्दल विचाराल तर माझे मार्ग वेगळे आहे,परंतू अल्पसंख्याक लोक सांगत असतील की देशात असहिष्णुता आहे तर त्यांचे मानले पाहिजे. तुम्ही त्यांच्या अनेक बाबींकडे दुर्लक्ष करतात. जर एखादा दलित सांगतो की मी घाबरललो आहे, मला लिंचिंग होण्याची भीती आहे. तर त्यांचे ऐकले पाहिजे. त्याकडे असे पाहिले नाही पाहिजे की हे आपल्या बरोबर घडले नाही तर सोडून द्या. आपल्याला त्यांचे ऐकणे आवश्यक आहे.

लेस्बियनच्या भूमिकेत दिसेल स्वरा
शीर कोरमा एक लेस्बियन कपलची कथा आहे. यात स्वरा बरोबर दिव्या दत्ता दिसेल. याशिवाय सिनेमात शबाना आजमी दिसणार आहे. स्वरा म्हणाली की तनु वेड्स मनू आणि जब वी मेट सारखे सिनेमातून आपण महिलांमध्ये असलेल्या भ्रम आणि त्यांची परिस्थिती पाहिली. परंतू यानंतर देखील सिनेमातील अभिनेत्रीवर कधीही बॅड श्रेणीत पाहण्यात आले नाही.

लोकसभा निवडणूक प्रचार केल्याने चार ब्रँडची कामे सुटली
राजकीय प्रकणात टीका आणि एखाद्या व्यक्तीला करण्यात येणाऱ्या समर्थनावर स्वरा भास्कर म्हणाली, ज्या दिवशी मी लोकसभा निवडणूकीत प्रचारासाठी उतरले तेव्हा चार ब्रँडने माझ्याकडून काम काढून घेतले. सार्वजनिक जीवनात अनेक बाबी असतात, अनेकदा सुपरस्टारच्या गाड्यांवर दगडफेक केली जाते, स्टार आपले जीवन जगताना आपले आयुष्य, कुटूंब आणि करिअर पणाला लावतात, परंतू एका चांगल्या समाजाची जबाबदारी आहे की त्यांनी सर्वांना संधी दिली पाहिजे.

या उमेदवारांसाठी स्वराने केला होता प्रचार
लोकसभा निवडणूकीत 2019 साली बेगुसरायमध्ये सीपीआयचा उमेदवार कन्हैया कुमार, दिल्लीत आप उमेदवार आतिशी आणि राघव चड्ढा तसेच सीबीएमचे उमेदवार अमर राम यांच्यासाठी स्वराने प्रचार केला होता.
Visit : policenama.com
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी