अभिनेत्री स्वरा भास्कर ‘या’ पत्रकाराला करतेय ‘डेट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री स्वरा भास्कर आपल्या बिंधास्त वक्तव्यासाठी आणि परखड मत मांडण्यासाठी ओळखली जाते. याआधी स्वरा आपल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली होती. तेव्हा स्वराचं ब्रेकअप झालं आहे असं वृत्त होतं. पु्न्हा एकदा स्वरा डेटींगमुळे चर्चेत आली आहे. 5 वर्ष तिने पटकथा लेखक हिमांशू वर्माला डेट केलं नंतर त्यांचं ब्रेकअप झालं होतं. पुन्हा तिच्या मनात प्रेमाची कळी फुलत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वरा रघु कर्नाडला डेट करत आहे. दिवंगत अभिनेते गिरीष कर्नाड यांचा मुलगा रघु हा पत्रकार आणि लेखक आहे. दोघंही सिनेमाला एकत्र जाताना स्पॉट झाले आहेत. म्हणून त्यांच्यात काहीतरी आहे असं म्हटलं जात आहे.

स्वरा आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड हिमांशूबद्दल सांगायचे झाले तर तनू वेड्स मनू या सिनेमात स्वरा सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत होती. हिमांशूने या सिनेमाची पटकथा लिहिली होती. यावेळी एकत्र काम करताना ते एकमेकांना डेट करू लागले. याशिवाय त्यांनी रांझना आणि नीलबट्टे सन्नाटा या सिनेमासाठी एकत्र काम केलं आहे.

स्वराच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने रांझना, तनू वेड्स मनू, नीलबट्टे सन्नाटा, वीरे दी वेडिंग या सिनेमांमध्ये काम केले आहे. तिने साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like