अभिनेत्री स्वरा भास्करच्या आई आणि कुकला कोरोना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. आत्तापर्यंत राजकीय, सामाजिक आणि बॉलिवूडमधील अनेकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करच्या आई आणि कुकला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. याबाबतची माहिती स्वरा भास्कर हिने स्वत: ट्विट करून दिली.

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर याचा संसर्ग होऊन अनेकांचा मृत्यू झाला आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण तरीही ही रुग्णसंख्या वाढत आहे. त्यानंतर आता स्वरा भास्करच्या आईला आणि कुक या दोघांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. याची माहिती ट्विटवरून देत स्वरा भास्कर म्हणाली, ‘तो घरी आला. माझी आई आणि कुक हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आता आम्ही आमच्या दिल्लीतील घरात आयसोलेट होत आहोत. कृपया डबल मास्क लावावा आणि घरातच थांबावे’.

दरम्यान, स्वरा भास्कर ही ‘जहां चार यार’ या चित्रपटाच्या शुटिंगसाठी गोव्यात गेली होती. मात्र, को-स्टार मेहर विजयाला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाचे शुटिंग थांबवण्यात आले आहे. त्यानंतर आता स्वरा भास्करच्याच आईला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.