Swara Bhasker | स्वरा भास्करला बॉलिवूडमध्ये ‘या’ कारणामुळे मिळत नाही काम; स्वतःच सांगितले कारण  

पोलीसनामा ऑनलाइन : Swara Bhasker | बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावरच नाही तर त्यांच्या स्पष्ट वक्तव्यामुळेदेखील चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्यात अभिनेत्री कंगना असो किंवा तापसी आता या यादीत स्वरा भास्करचेही नाव जोडले जात आहे. स्वरा ही नेहमीच तिच्या  स्पष्ट वक्तव्यामुळे चर्चेत असते. एवढेच नाही तर तिच्या या वक्तव्यामुळे तिला ट्रोलदेखील केले जाते. आता तिच्या या स्पष्ट वक्तव्यामुळेच तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे मत तिने एका मुलाखतीत सांगितले आहे. (Swara Bhasker)

स्वरांनी आजपर्यंत बॉलिवूडमध्ये पाच ते सहा सुपर हिट चित्रपट दिले आहेत. मात्र, या चित्रपटांपेक्षा ती तिच्या स्पष्ट वक्तव्यामुळे चर्चेत असते. ती नेहमी राजकीय सामाजिक मुद्द्यांवर आपले मत मांडत असते. नुकत्याच एका मुलाखतीत तिने म्हटले की, “मला माझं काम सर्वात जास्त आवडतं मात्र सध्या माझ्या या स्पष्टवक्तेपणामुळे मला काम मिळत नाही. मी नेहमीच मला मिळालेल्या संधीमुळे चांगले काम केले आहे. आजपर्यंत माझ्या कामाला कधीही वाईट म्हटलं गेलं नाही. एवढेच नाही तर समीक्षकांनीदेखील माझ्या कामाचे कौतुक केले आहे. पण तरीही मला आता फारसं काम मिळत नाही”.

स्वरा भास्करने ‘वीरे दी वेडिंग’, ‘निल बट्टे सन्नाटा’,  ‘जहाँ चार यार’ ‘प्रेम रतन धन पायो’ असे अनेक हिट
चित्रपट प्रेक्षकांना दिले आहे. तर ‘रसभरी’ या वेब सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिकादेखील साकारली होती.
स्वरा याआधीदेखील राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाल्यामुळे चर्चेत होती.
त्यामुळे काही नेटकऱ्यांनी कौतुक केले होते, तर काहींनी तिला ट्रोलदेखील केले होते.
एवढेच नाही सध्या सुरू असलेला द कश्मीर फाइलवरदेखील तिने तिचे मत मांडल्याने तिला ट्रोलर्सचा सामना
करावा लागला होता. (Swara Bhasker) 

Web Title :- Swara Bhasker |swara bhaskar not getting enough work in bollywood she speak about reason

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Weight Loss With Eggs | अंड्यासोबत ‘या’ 3 गोष्टींचे कॉम्बिनेशन वेगाने कमी करते वजन, स्वस्त-सोप्या टिप्स

Summer Diet Tips | उन्हाळ्यात आवश्य खा ‘हे’ 4 प्रकारचे मेलन, आरोग्य राहील चांगले !