‘जम्मू-कश्मीर-लडाख’चा नकाशा काळा दाखवला, अभिनेत्री स्वरा भास्कर सर्वांच्याच ‘रडार’वर, लोक ‘भडकले’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर पुन्हा एकदा तिच्या ट्विटमुळे ट्रोल झाली आहे. काश्मिरच्या स्थितीवर दिल्लीत होत असलेल्या निषेधाचे समर्थन करण्यासाठी स्वराने ट्विट केले आहे.

स्वरा हिने एका ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘ईदच्या उत्सवात कोणीही एकटे समजू नका दिल्लीकरांनो या काश्मिरी विद्यार्थ्यांबद्दल थोडेसे प्रेम दाखवा. आपणही थोडे जेवण आणून सामील व्हा.’

स्वरा हिने सोमवारी दुपारी दीड वाजता दिल्लीतील जंतर-मंतर येथे जमून निषेध करण्याचे आवाहन केले आहे . त्याचबरोबर एक पोस्टरही शेअर केले आहे . ज्यात काश्मीरचा नकाशा काळा दाखवला आहे. पोस्टरमध्ये लिहिले आहे की , ‘ईद घरापासून दूर. काश्मीरमध्ये कम्युनिकेशनला बंदी आहे. म्हणून तुम्ही आमच्या सोबत ईद साजरी करा. जम्मू-काश्मीरमधील लोकांकडून ईदचे आयोजन केले आहे. तुमचा डबा सोबत आणा.’

स्वराची ही निषेध करण्याची पद्धत अनेक लोकांनी आवडली नाही. त्यावरून लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका युजरने लिहले आहे की , ‘बीबीसीवाल्यांनी सांगितलं का ?’

अन्य एका युजरने लिहले आहे की , ‘हे विद्यार्थी २ वर्षांपूर्वी क्रिकेट सामन्यात पाकिस्तानकडून भारताचा पराभव साजरा करीत नव्हते काय ? तर त्यांना लाथ मारा. देशविरोधी गोष्टींना लाथ मारायला हवी. जर ते खरोखरच भारतीय असतील तर त्यांना बरेच काही मिळेल. जे आमच्या क्षमतेच्या पलीकडे आहे.’

एका युजरने तिने काश्मीरचा भाग काळा दाखवल्याबद्दल विरोध दर्शवत म्हटले आहे की , ‘तुला जे करायचंय ते कर मात्र काश्मीरमध्ये अंधार आहे असं दाखवू नको. तिथे आत्ताच तर सूर्योदय झाला आहे आणि तिरंगा फडकत आहे.’

काश्मीरचा फोटो काळा पोस्ट केल्याने बर्‍याच युजर्सनी आक्षेप घेतला आहे. एका युजरने लिहले आहे की , ‘ईद साजरी करण्यासाठी आम्ही डबे घेऊन येऊ शकतो. मात्र तू आमच्या भारताचा हिस्सा काळा का दाखवला आहे ? काश्मीरमध्येही तिरंगा फडकावला जाणार आहे याचा तुला आनंद नाही का ? या शब्दात तिला फटकारले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like