#swarabhaskar स्वरा भास्करचं नाव सोशल मीडियावर अचानकपणे आलं ‘ट्रेंडिंग’मध्ये, मिनीटामध्ये आले हजारो ‘कमेंट्स’, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे बर्‍याचदा चर्चेत असते. परंतु शनिवारी संध्याकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर तिचे नाव मोठ्या प्रमाणात ट्रेंड होऊ लागले. अल्पावधीतच, हजारो कमेंट येऊ लागल्या. प्रत्येकाला हे जाणून घ्यायची उत्सुकता होती की, आता असे काय घडले, जेणेकरून स्वराचे नाव ट्रेंडिंगमध्ये आले.

 

दरम्यान, स्वरा तिच्या मुलाखतीमुळे ट्रोल होत आहे, ज्यात तिने तिचे वय चुकीचे सांगितले. पत्रकार रुबिका लियाकत एका कार्यक्रमात स्वरासोबत चर्चा करत असताना एनआरसीचा मुद्दा पुढे आला. रुबिका म्हणाली की तुम्ही बर्‍याच वर्षांपासून एक्टिविस्ट आहात, तुम्ही आधी विरोध का केला नाही ? यावर स्वरा म्हणाली, ‘२०१० मध्ये तर मी १५ वर्षांची होते’. तिच्या या वाक्यावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. कारण स्वराचे सध्याचे वय वेगळे आहे.

https://twitter.com/vineetavarshney/status/1231207146148237312

https://twitter.com/OperationLotus_/status/1231211778455019520