Swarad Foundation Pune | स्वारद फाऊंडेशन ट्रस्ट आणि हिंदू जनजागृति समितीच्या वतीने युवती व महिलांना मोफत शौर्य प्रशिक्षण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Swarad Foundation Pune | स्वारद फाऊंडेशन ट्रस्ट आणि हिंदू जनजागृति समितीच्या वतीने मागील दोन वर्षापासून वय वर्षे १० ते ४० वर्षापर्यंत युवती व महिलांना मोफत शौर्य प्रशिक्षण दिले जाते. रविवार दि. २३ जुलै २०२३ रोजी शौर्य प्रशिक्षणांतर्गत लाठीकाठी चालविणे, दंड-साखळी, कराटे असे साहसी क्रिडा प्रकार आणि आध्यात्मिक आणि बौद्धिक स्तरावर मार्गदर्शन केले. (Swarad Foundation Pune)

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी मिळून गुरु पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.हिंदू धर्म संस्थापक भगवान श्रीकृष्ण, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वारद फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा स्वाती शरद मोहोळ (Swati Sharad Mohol), पुनम मेहता (माय होम इंडियाच्या उपाध्यक्ष), हिंदू जनजागृती समितीचे विजय चौधरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. (Swarad Foundation Pune)

प्रशिक्षणार्थींनी आपापल्या पालकांचे पाद्य पूजन करून, पालकांच्या प्रति असलेली कृतज्ञता व्यक्त केली.
प्रशिक्षणार्थींनी साहसी खेळाचे प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
विश्व हिंदू परिषदेचे पुणे शहर प्रमुख किशोर चव्हाण आणि निवृत्त ACP प्रतिभा जोशी यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
शिववंदाना आणि वंदे मातरम् ह्या गीतांनी कार्यक्रमाची सांगता झाली.
स्वारद फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा स्वाती मोहोळ यांनी सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Monsoon Session | ‘विरोधी पक्षनेत्यांनी आम्हाला जे शहाणपण शिकवले ते…’ निधीवाटपावरुन सभागृहात खडाजंगी, देवेंद्र फडणवीस म्हणाले – ‘मला दुर्दैवाने इतिहासात…’ (व्हिडिओ)