‘स्वराज्यरक्षक संभाजी’मालिकेतील ‘या’ अभिनेत्याची हॉलिवडूमध्ये ‘एन्ट्री’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी. या मालिकेतील प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या एका पात्राची भूमिका साकारणारा एक अभिनेता थेट आता हॉलिवूडमध्ये दिसणार आहे. या मालिकेतील कोंडाजीबाबाची भूमिका साकारणारे अभिनेता आनंद काळे लवकरच आता हॉलिवूडपटात झळकणार आहे. ‘रिमेम्बर अ‍ॅम्निशिया’ असं हॉलिवूडपटाचं नाव.
Anand Kale
अभिनेता आनंद काळे ‘रिमेम्बर अ‍ॅम्निशिया’ या हॉलिवूडपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात त्यांनी अभिनय तर केलाच आहे सोबतच आनंद या सिनेमाच्या निर्मात्यांपैकी आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या सिनेमात अमेरिकन अभिनेता दिलीप राव मुख्य भूमिकेत आहे. आनंद यांच्या भूमिकेविषयी सांगायचे झाले तर त्यांनी समीर नावचं पात्र साकारलं आहे. या सिनेमाचं काम पूर्ण झालं असून नोव्हेंबर अखेरपर्यंत हा सिनेमा भारतात प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे.

आणखी एक विशेष बाब अशी की, या सिनेमाचं 18 दिवसांचं शुटींग कोल्हापूर आणि गोव्यात पार पडलं. हे शुटींग दीड वर्षांपूर्वीच पार पडलं होतं. यावेळी सिनेमाचे तंत्रज्ञ, अभिनेते भारतात आले होते असेही आनंद यांनी सांगितले. सध्या आनंद यांच्या चाहत्यांसाठी ही खूपच आनंदाची बातमी आहे. अमेरिकेतील एक डॉक्टर जेव्हा भारतात येतो तेव्हा त्याला कोणत्या अनुभवांना सामोरं जावं लागतं हे यात पाहायला मिळणार आहे.

Visit : policenama.com